Delhi Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दिल्लीतील नेत्या सोनिया दुहान यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार गटातून बाहेर पडल्यानंतर त्या अजित पवार गटात जाण्याची चर्चा होती.
दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती. मात्र त्या अचानकच काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.
आपण हरियाणा काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे सोनिया दुहान यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केले. मी आज हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, प्रदेशाध्यक्ष उदय भान, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, खासदार दीपेंदर हुड्डा यांच्या उपस्थित हरियाणा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सकाळीच स्पष्ट केले होते.
आता हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच दुहान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, शरद पवार गटात नाराज असलेल्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. तसेच शरद पवारांवर निष्ठा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शरद पवार गट सोडताना दुहान यांनी सुप्रिया सुळे या कधीच आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत. आमच्यासाठी शरद पवारच लीडर राहिले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. दुहान यांच्या सुळेंवरील विधानाने दिल्लीसह राज्यातही खळबळ उडाली होती.
आता दुहान यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत फोटो पोस्ट करत औरत दुर्गा है, औरत काली है, औरत लक्ष्मी है, वही औरत इन्दिरा भी है, असे म्हणाल्या. आता काँग्रेस सोनिया दुहान यांना हरियाणा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार का, याकडे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.