Congress Election Strategy : कर्नाटक, तेलंगणातील यशानंतर काँग्रेस दक्षिण भारतासाठी घेणार मोठा निर्णय! खुद्द सोनिया गांधी...

Soniya Gandhi Will go to Rajya Sabha from Karnataka : दक्षिण भारतात काँग्रेस पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांना या भागात आणण्याची व्यूहरचना काँग्रेसकडून केली जात आहे.
Soniya Gandhi
Soniya GandhiSarkarnama
Published on
Updated on

Bangalore News : कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने दक्षिण भारत आपल्या बाजूने कायम राहावा, यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण भारतातून आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने सोनिया गांधी यांना कर्नाटकातून राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सोनिया गांधी पुन्हा एकदा कर्नाटकच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. (Sonia Gandhi likely to go to Rajya Sabha from Karnataka)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला, त्यामुळे आत्मविश्वास मिळालेल्या काँग्रेसने आणखी एका दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या तेलंगणामध्येही एकहाती सत्ता मिळविली. उत्तर भारतात निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकीत भाजप सत्तेवर आला आहे.

काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानमधील सत्ता गमावावी लागली. उत्तर भारतातील पराभव आणि दक्षिण भारताकडून मिळणारा हात यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकीत दक्षिण भारतातील जागांवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यातूनच सोनिया गांधींसारख्या नेत्या कर्नाटकातून राज्यसभेवर गेल्यास त्याचा कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाऊ शकतो, त्यातूनच राज्यसभेसाठी कर्नाटकातून सोनिया गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Soniya Gandhi
Chandrapur Bank Scam : चंद्रपूर जिल्हा बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत बड्या बॅंक पदाधिकाऱ्यांची नावे...

विशेष म्हणजे इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या मित्रपक्षांची स्थितीही दक्षिण भारतातच मजबूत आहे. तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष सत्तेवर आहे. तसेच, डाव्यांची केरळमध्ये मोठी ताकद आहे. काँग्रेसची स्वतःची ताकद आहे, त्यामुळे दक्षिण भारतात काँग्रेस पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांना या भागात आणण्याची व्यूहरचना काँग्रेसकडून केली जात आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील नेते हे सोनिया गांधी यांच्यासमोर राज्यसभेसाठी कर्नाटकाचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आहे. कारण, सोनिया गांधी या आता रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कर्नाटकातील काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितले की, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सोनिया गांधी याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील.

Soniya Gandhi
MNS Attack On BJP : नवाब मलिक प्रकरणावरून मनसेचा भाजपवर हल्लाबोल; ‘तुमच्या राजकीय ढोंगीपणाचा...’

दरम्यान, कर्नाटकातून राज्यसभेवर गेलेले डॉ. एल. हनुमंतय्या, सय्यद नसीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांची खासदारकीची मुदत येत्या दोन एप्रिल २०२४ रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेत काँग्रेस पक्षाचे १३६ आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष तीनही जागा आरामात जिंकू शकतो. या तीनपैकी एक जागेवरून सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती कर्नाटकातील काँग्रेस नेते करणार आहेत.

Soniya Gandhi
Ravikant Tupkar : पीयूष गोयल, देवेंद्र फडणवीस करणार रविकांत तुपकरांशी वाटाघाटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com