MNS Attack On BJP : नवाब मलिक प्रकरणावरून मनसेचा भाजपवर हल्लाबोल; ‘तुमच्या राजकीय ढोंगीपणाचा...’

Nawab Malik Case : सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड?
Raj Thackeray-Nawab Malik-Devendra Fadnavis
Raj Thackeray-Nawab Malik-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरून राज्यात सध्या राजकीय चिखलफेक सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसेने मात्र नवाब मलिक यांच्या सत्तेतील सहभागावरून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. ‘तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल, नाहीतर जनता धडा शिकवेल,’ असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. (MNS attacks BJP over Nawab Malik case)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांनी गुरुवारी (ता. 7 डिसेंबर) नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यातही त्यांची उपस्थिती ही सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाकावर दिसून आली. त्यावरून विधान परिषदेत मुद्दा उपस्थित झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray-Nawab Malik-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची वेळ; मलिक-पटेलांवरून फडणवीसांवर ठाकरेंचा निशाणा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसताना काय वाटत नाही का, असा सवाल केला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जोरदार उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल केला होता.

विधान परिषदेतील उत्तरानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक हे महायुतीत नको, अशी भूमिका मांडली होती. त्यावर अजित पवार गटातील नेत्यांनी फडणवीस यांनी पत्र जाहीर करायला नको होते, अशी काहींशी नाराजीचा भावना मांडली. विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही मतभेद दिसून आले.

Raj Thackeray-Nawab Malik-Devendra Fadnavis
Navneet Rana : उद्धव ठाकरेंशी पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा

दरम्यान, याच वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेत भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. त्यात पक्षाने म्हटले आहे की, ‘इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? असा सवालही मनसेकडून भाजपला करण्यात आलेला आहे.

'नवाब'चा 'जवाब' द्या की नका देऊ. पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Raj Thackeray-Nawab Malik-Devendra Fadnavis
Nawab Malik : विधिमंडळात नवाब मलिकांची एन्ट्री अन् नव्या वादाला फुटले तोंड...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com