वाद टोकाला; माजी मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्ष थेट दिल्लीत

काँग्रेसचे डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.
Congress
Congress File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसची (Congress) डोकेदुखी कमी होण्याऐवजी आता वाढतच चालली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता आणखी एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसला रामराम करण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

पंजाबप्रमाणेच मेघालयमध्ये (Meghalaya) प्रदेशाध्यक्षांना वैतागून माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangma) पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या ते मेघालय विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. संगमा हे खासदार विन्सेन्ट पाला यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून नाराज आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे दहांहून अधिक आमदार बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

Congress
धक्कादायक : प्रियांका गांधी कैदेत असलेल्या खोलीवर ड्रोनच्या घिरट्या

या घडामोडींच्या पाश्वभूमीवर संगमा व पाला या दोघांनी सोमवारी रात्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांची भेट घेतली आहे. संगमा व पाला यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर संगमा म्हणाले, बैठक अत्यंत सकारात्मक झाली. बैठकीमध्ये राज्यातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. लोकशाहीसाठी राजकीय पक्षाचे सदस्य व इतरांनी आपल्या तत्वांशी तडजोड करू नये.

हाय कमांडने राज्यात हस्तक्षेप करुन अंतर्गत वाद सोडवावेत, यासाठी संगमा आग्रही आहेत. संगमा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेवर थेटपणे उत्तर देणे टाळले आहे. परंतु, याचा पूर्णपणे इन्कार केलेला नाही. हाय कमांडने मेघालयात लक्ष न घातल्यास आणखी एका राज्यात प्रदेशाध्यक्षांमुळे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी संगमा व पाला यांना दिल्लीत बोलावले होते.

Congress
थरारक : शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेला...व्हि़डीओ व्हायरल

पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते संघटनेसाठी चांगले नेते नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता मेघालयमध्येही माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांमधील वाट पेटला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला की नाही, हे पुढील काही दिवसांतच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com