Rahul Gandhi : भारत जोडोमुळं मिळालं यश; राहुल गांधी आता स्वतःला तीन पैलूवर तपासणार, ती कोणकोणती?

Commentary on Rahul Gandhi Bharat Jodo Yatra during his visit to America : अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमुळे देशाच्या राजकारणावर काय परिणाम झाल्या, यावर भाष्य केलं.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा सुरू करण्याचं कारण आणि त्यातून मिळालेल्या यशावर भाष्य केलं. तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी टेक्सास विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी झाले.

तिथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी भारत जोडो यात्रेमुळे संपूर्ण राजकीय दृष्टिकोन बदलल्याची प्रतिक्रिया दिली. तसंच विरोधी पक्षनेता म्हणून आलेली जबाबदारी आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर मोठं भाष्य केलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून देशाच्या राजकारणात 'प्रेम', 'सन्मान' आणि 'विनम्रता' वाढवण्यावर आपलं भविष्यातील राजकारण असेल, असं सांगितलं. "राजकारणात हे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून, ती सध्या देशाच्या राजकारणातून नाहीसे झाली आहेत. पाच वर्षांनंतर मी राजकारणात यशस्वी दिसत असलो, तरी मी पुढं वरील तीन गोष्टींवर आपलं राजकारण परखणार आहे. देशाच्या राजकारणात प्रेम रुजवू शकलो का? देशातील नेत्यांना विनम्र करू शकलो आहे का? आणि देशातील लोकांमध्ये एकमेकांविषयी सन्मानजनक भावना तयार करू शकलो आहे का? या तीन गोष्टंवर मी माझ्या राजकीय वाटचालीचं भविष्य पडताळून पाहणार आहे", असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

Rahul Gandhi
Vinesh Phogat : 15 वर्षांपासून ‘या’ मतदारसंघात उमेदवाराचा पराभव, काँग्रेसनं विनेशवरच डाव उलटवला?

लोकांशी संवादाची माध्यमं बंद केली

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्याचं कारण सांगितलं. "भारतात लोकांशी संवाद साधण्याचं सर्व मार्ग बंद करण्यात आली होती. संसदेत केलेलं भाषण देखील टीव्हीवर दाखवलं जात नव्हतं. माध्यम देखील आपली भाषणं, विधान आणि वक्तव्याकडे दुर्लक्ष करायची. कायद्याकडून देखील मदत मिळत नव्हती. यातून आम्ही नवीन मार्ग स्वीकारला. वेगळा मीडिया आणि संस्थांना उभं करत थेट लोकांशी संवाद सुरू केला. यातून भारत जोडो यात्राची संकल्पना पुढं आली आणि देशात या यात्रेच्या माध्यमातून 4 हजार किलोमीटर प्रवास केला", असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

Rahul Gandhi
DK Shivakumar : शिवकुमार यांची जादू US च्या निवडणुकीतही चालणार? ट्रम्प की कमला हॅरिस, कुणाचं आलं बोलावणं?   

यात्रे दरम्यान कोणता त्रास झाला

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरवातीला यात्रेत खूप त्रास झाला. दररोज 10 किलोमीटर चालायचे. यातून त्यांच्या गुडघ्यांमध्ये त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना सुरवातीला वाटायचे की, आपण हे काय सुरू केलय. परंतु तीन ते चार दिवसानंतर यात्रेत राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधण्याची पद्धत बदलली आणि त्याचा चांगला परिणाम दिसू लागला. यावर राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीमुळे राजकीय दृष्टिकोन बदलला आणि लोकांमध्ये विश्वासर्हता वाढवल्याचे राहुल गांधी सांगितले.

यात्रा आत्मिक सुख देणारी

"या यात्रेद्वारे देशातील राजकारणात प्रेम ही संकल्पना रुजवण्यात आली. राजकारणात प्रेम ही संकल्पना नसते. तिरस्कार, घृणा, किळस आणि भ्रष्टाचार याचभोवती राजकारण फिरते. परंतु भारत जोडो यात्रेमुळे एक वेगळी संकल्पना मांडली. या यात्रेमुळे भारतीय राजकारणात प्रेम ही संकल्पना रुजवता आल्याचा आनंद आहे", असेही राहुल गांधी यांनी म्हटले. 'भारतीय राजकारणात 'प्रेम' ही संकल्पना रुजवताना ही यात्रा फक्त शारीरिक नव्हती, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं. ही यात्रा आत्मिक आणि राजकीय दृष्टिकोन बदलणारी यात्रा होती', असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com