Jayanti Celebration: पटेल, बिरसा मुंडा, वाजपेयींच्या जयंतीसाठी विशेष समित्या; PM मोदींचा काय आहे प्लॅन?

Jayanti Celebration: यासाठी त्यांनी तीन स्वतंत्र्य समित्या नेमल्या असून ते स्वतः या समित्यांचं अध्यक्षपद भूषणवणार आहेत.
Patel, Munda, Vajpayee
Patel, Munda, Vajpayee
Published on
Updated on

Jayanti Celebration: देशाचे पोलादी पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे, तसंच स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. भारतातील आदिवासी समाजाच्या न्याय-हक्कांसाठी एल्गार पुकारणारे बिरसा मुंडा आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंती सोहळे खास पद्धतीनं साजरे करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला आहे. यासाठी त्यांनी तीन स्वतंत्र्य समित्या नेमल्या असून ते स्वतः या समित्यांचं अध्यक्षपद भूषणवणार आहेत. पण यामागे पंतप्रधानांचं नेमका प्लॅन का आहे? जाणून घ्या.

Patel, Munda, Vajpayee
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेबाबत नवी अपडेट! 26 लाख लाभार्थी...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार कारवाई

केंद्रीय सांस्कृतीकडं मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या अधिसूचनांनंतर हा निर्णय सार्वजनिक झाला आहे. सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती तसंच अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सांस्कृतीक कार्यक्रम, कलेचं वस्तूंचं प्रदेर्शनं, तरुणांसाठी विविध उपक्रम यांचा समावेश असणार आहे.

Patel, Munda, Vajpayee
Sadabhau Khot: "थार गाड्यांतून फिरणारे कॉर्पोरेट काम करणारे गोरक्षणाचं रॅकेट चालवतात"; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

सरकारचं म्हणणं आहे की, या महापुरुषांचं योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या आदर्शांना राष्ट्रीय जीवनात उतरवणं हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांच्या रुपरेषा ठरवण्यासाठी ज्या तीन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वरिष्ठ मंत्री, राज्यांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा देखील समावेश असणार आहे. या तिन्ही समित्यांचं अध्यक्षपद स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार आहेत.

Patel, Munda, Vajpayee
Sadabhau Khot Attack Pune: धक्कादायक! पुण्यात गोरक्षकांचा आमदार सदाभाऊ खोतांवर हल्ला? पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट

केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयानं २५ ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी झाला होता. स्वातंत्र्य लढ्यातील एक मोठे नेते म्हणून ते पुढे आले. तसंच स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री बनले. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. गुजरातमध्ये उभारण्यात आलेला त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' त्यांच्या योगदान आणि व्यक्तिमत्वाची साक्ष देते.

Patel, Munda, Vajpayee
Ambadas Danve Letter To Devendra Fadnavis : तरुणाच्या खूनाची एसआयटी चौकशी करा! अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

त्याचबरोबर बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी केली जाणार आहे. बिरसा मुंडा एक आदिवासी नायक आणि स्वातंत्रसैनिक होते. त्यांना आजही 'धऱती आबा' नावानं ओळखलं जातं. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा शंभरावा जयंती उत्सव असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये भारतानं पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी केली. यामुळं देश जागतीक स्तरावर मजबूत बनला. या तिन्ही नेत्यांचं देशकार्य जनतेला कळावं यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com