Sting Operation news : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात शिजला स्टिंग ऑपरेशनचा प्लॅन? पोलिसांनी उडवून दिली खळबळ

HD Kumaraswamy, Karnataka Sting Operation, Siddaramaiah Sting Operation : पोलिसांनी याप्रकरणी यापूर्वीच रितेश पांडे याला अटक केली आहे. त्याच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Union Minister HD Kumaraswamy with PM Narendra Modi
Union Minister HD Kumaraswamy with PM Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

HD Kumaraswamy News : कर्नाटकमध्ये कथित स्टिंग ऑपरेशनवरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडिओ सप्टेंबर महिन्यात व्हायरल झाले होते. यामध्ये आता थेट केंद्रीय मंत्र्‍यांचे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी या प्रकरणाने नवे वळण घेतल्याने केंद्रीय मंत्र्‍यांची कोंडी झाली आहे.

केंद्रीय मंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनीच रविवारी याबाबत मोठा धमाका केला. सिद्धरामय्या यांना लक्ष्य करणाऱ्या कथित स्टिंग ऑपरेशनसाठी वापरण्यात आलेला मोबाइल कुमारस्वामी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रज्वल प्रसाद या व्यक्तीला देण्यात आला होता. हा मोबाईल दिल्लीतच खरेदी करण्यात आला होता.

पोलिसांनी याप्रकरणी यापूर्वीच रितेश पांडे याला अटक केली आहे. त्याच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रज्वल प्रसाद याच्या सूचनेनुसारच फोन सुपूर्द करण्यात आल्याचे पांडे याने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पांडे हा दिल्लीतील आहे. त्याला व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केल्याप्रकरणी २४ ऑक्टोबरला अटक केले आहे. तो कथित स्टिंग ऑपरेशन प्रकरणी अटक केलेला पहिला आरोपी आहे.

Union Minister HD Kumaraswamy with PM Narendra Modi
पतीच्या हत्येनंतर राजकारणात, आता बड्या नेत्याच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रसाद याच्या सांगण्यावरून विनोद शर्मा आणि पांडे यांनी दिल्लीतील करोलबाग येथील एका दुकानातून मोबाइल विकत घेत तो कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी प्रज्वल प्रसाद याच्याकडे दिला होता. हे तिघे कुमारस्वामी यांच्या कार्यालयात काम करत होते, असा दावाही पोलिसांनी केला आहे.

Union Minister HD Kumaraswamy with PM Narendra Modi
BJP Election Defeat : बलाढ्य भाजपचे बालेकिल्ले नेस्तनाबूत; विधानपरिषदेत 7 पैकी एकच आमदार, पदवीधरांनी सपशेल नाकारले...

कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये कुमारस्वामी यांच्या सहभागाबाबत मात्र पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कुमारस्वामी यांनी हे आरोप फेटाळून लावत आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप केला. तपासाचा रोख जाणीवपूर्वक आपल्याला व पक्षाला लक्ष्य करण्यासाठी वळविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.