आता भाजप सरकारच्या परवानगीशिवाय शूटिंग करता येणार नाही!

खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली माहिती...
BJP
BJPsarkarnama
Published on
Updated on

भोपाळ : अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रमुख भूमिका असलेल्या 'आश्रम' (Ashram) या वेबसिरीजच्या सेटवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी राडा केला. दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. तसेच सेटवरील काही कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून तोडफोडही झाली आहे. बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळाचे थेट समर्थन मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले नसले तरी त्यांनी त्यामागच्या कारणांवर सहमती दर्शवली.

'आश्रम' या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनचे शूटींग भोपाळमध्ये सुरू आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या सेटवर अचानक हल्लाबोल केला. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद, जय श्रीराम अशा घोषणा देत कार्यकर्ते सेटवर आले. काहींच्या हातात काठ्याही होत्या. सेटवर जात त्यांनी झा यांच्या अंगावर शाई फेकली. काही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत.

BJP
अमित शहांनी त्याला थेट आपला मोबाईल नंबर दिला अन् म्हणाले...

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) म्हणाले, आश्रमच्या शुटींगवरही आक्षेप आहे. आमच्या भावनांना ठेच पोहचेल अशी दृश्य चित्रित का केली जातात. हिंमत असेल तर दुसऱ्या धर्माच्या भावनांना ठेच पोहचेल, अशी दृश्य का चित्रित करत नाही. आता यापुढे कायमस्वरूपी एक नियम केला जाईल. आपत्तीजनक किंवा कोणत्या धर्माविषयी आपत्तीजनक दृश्य असल्यास आधी प्रशासनाला ती कथा द्यावी. प्रशासनाच्या परवानगीनंतरच त्याचे शूटींग करता येईल. मध्य प्रदेशात शुटिंगसाठी स्वागत आहे. पण आपत्तीजनक काही असेल तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

BJP
बजरंग दलाचा राडा; बॉबी देओलचा शोध अन् प्रकाश झा यांचं तोंड केलंं काळं

दरम्यान, आश्रम या वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदूंचा अपमान होत असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला. वेबसिरीजचे नाव बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. झा यांनी हे नाव बदलण्याची तयारी दर्शवल्याचेही बजरंग दलाच्या नेत्याने सांगितले. त्यांनी आश्रम-1, आश्रम-2 सिरीज बनवल्या आणि आता आश्रम-3 चे शुटिंग सुरू आहे. प्रकाश झा यांनी यामध्ये गुरू महिलांचा छळ करत असल्याचे दाखविले आहे. चर्च किंवा मदरशावर असा चित्रपट बनविण्याची हिंमत त्यांच्यात आहे का, असं आव्हान बजरंग दलाचे नेते सुशील सुरहेले यांनी दिले.

आम्ही झा यांना ही सिरीज बनवू देणार आहे. आम्ही फक्त प्रकाश झा यांचा चेहरा काळा केला आहे. आता आम्ही बॉबी देओलला शोधत आहोत. त्याने त्याच्या भावाकडून (सनी देओल) काही शिकायला हवं. त्याच्या भावाने देशभक्तीपर चित्रपट तयार केले आहेत, असंही सुरहेले म्हणाले. मात्र, झा किंवा त्यांच्या टीममधील कुणीही याबाबत तक्रार दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com