
Role of Election Commission of India in Implementation : बिहारमधील मतदारयादी पुनर्पडताळणीच्या SIR मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून हा मुद्दा ऐरणीवर आणला. दुसरीकडे विरोधकांकडून सुप्रीम कोर्टातही लढा सुरू आहे. या लढ्याला सोमवारी काही प्रमाणात यश आले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने विरोधकांची मोठी मागणी मान्य केली आहे. SIR प्रक्रियेत आधार कार्ड हा इतर 11 कार्डप्रमाणे पुरावा म्हणून गृहित धरावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. ती मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टाने भारतीय निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत.
SIR या प्रक्रियेत आधार कार्ड 12 वा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा, असे आदेश देताना सुप्रीम कोर्टाने आधाऱ कार्डला नागरिकतेचा पुरावा मानले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याचे निर्देशही कोर्टाने आयोगाला दिले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा आधार कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता.
कपिल सिब्बल म्हणाले की, ‘कोर्टाचे आधीचे तीन आदेश उपलब्ध आहेत. त्यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्याबाबत म्हटले आहे. मात्र, बीएलओकडून आधारला मान्यता दिली जात नाही. आधार कार्डला 12 वा पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, हे अपेक्षित असताना बीएलओ अशी भूमिका घेत आहेत.’ त्यावर कोर्ट म्हणाले, आधार नागरिकतेचा पुरावा नाही. पण रेशन कार्डप्रमाणे एक पुरावा म्हणून पाहिले जाऊ शकते.
निवडणूक आयोगाने कोर्टात बाजू मांडताना म्हटले आहे की, ‘तात्पुरत्या मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेल्या 7.24 कोटी मतदारांपैकी 99.5 टक्के मतदारांनी SIR प्रक्रियेदरम्यान आपल्या पात्रतेसाठी आवश्यक पुरावे जमा केले आहेत.’ दरम्यान, आज कोर्टाने आधार कार्डला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश दिल्याने मतदारयादीतून नाव वगळण्यात आलेल्या मतदारांना दिलासा मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.