

Supreme Court Latest Judgment : घटस्फोटाच्या प्रकरणात व्यभिचार सिद्ध करण्यासाठी मागितलेले कॉल डिटेल्स आणि हॉटेल बुकिंगचे तपशील पत्नीला देऊ नये;
कारण आपल्याला गोपनियतेचा अधिकार आहे, अशी पतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम राखला.
कायदा व्यभिचाराला घटस्फोटासाठी वैध आधार मानतो. घटस्फोटाच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने (Supreme Court) पतीच्या हॉटेलमधील वास्तव्याचे तपशील, वेगवेगळे बिल्स आणि ओळखपत्रे सीलबंद पाकिटात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र पतीने आदेशाच्या विरोधात जाऊन आपल्याला गोपनियतेचा अधिकार असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.
गोपनीयतेचा अधिकार घटनात्मक अधिकार असला तरी तो अमर्याद नाही. सार्वजनिक हितासाठी आणि न्यायासाठी त्यावर योग्य ते निर्बंध लादले जाऊ शकतात, या सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाचा संदर्भ उच्च न्यायालयाने दिला होता. या निकलाला पतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर पतीचे विवाहबाह्य (Marriage) संबंध सिद्ध करण्यासाठी पत्नी कॉल डिटेल्स आणि हॉटेल बुकिंगचे तपशील असे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाची मदत घेऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या ‘कलम 14’ नुसार, वादाशी संबंधित कोणताही अहवाल किंवा दस्तावेज पुरावा म्हणून स्वीकारण्याचे पूर्ण अधिकार न्यायालयाला आहेत. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, व्यभिचारासारख्या प्रकरणांमध्ये थेट पुरावे मिळणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे हॉटेलमधील वास्तव्याचे बिल, ओळखपत्रे आणि ‘कॉल डिटेल्स’वरून पतीचे अन्य महिलेशी असलेले संबंध स्पष्ट होऊ शकतात.
हिंदू विवाह कायद्यानुसार, व्यभिचार हा घटस्फोटाचा स्पष्ट आधार असल्याने, गोपनीयतेच्या अधिकाराचा आडोसा घेऊन अशा प्रकरणांत पतीला पुराव्यांपासून संरक्षण देणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वैवाहिक संबंधांमधील पारदर्शकता आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने व्यभिचाराचे आरोप असलेल्या पतीचा गोपनीयतेचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने पतीचे अपील फेटाळून लावले. 10 मे 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.