MLA Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा दिवस: एकाच दिवशी शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांचा 'फैसला'

Shivsena NCP MLA Disqualification Case Hearing on August 7 : दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. 7 ॲागस्ट रोजी ही सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

त्यांच्या सुनावणीची तारीख ठरली आहे. दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. 7 ॲागस्ट रोजी ही सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी सुनावणी गेल्या अनेक महिन्यापासून रखडली होती. सुप्रीम कोर्टाने आता या सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी या सुनावणीसाठी सप्टेंबर महिन्यातील तारीख देण्यात आली होती. तर काल (सोमवारी) झालेल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दोन्ही प्रकरणे एकदाच ऐकू असे म्हणत 3 ऑगस्ट ही तारीख दिली होती. त्यानंतर आज शिवसेनेची सुनावणीही 7 ॲागस्ट रोजी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

Rahul Narwekar
Shelke Vs Bhegade: 'मावळ' कुणाचा? बाळा भेगडेंना शेळकेंनी सांगितला 'बेसिक फॉर्म्युला'; ज्याचा आमदार, त्यांची जागा!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली.

त्याचा निकाल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी जाहीर केला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आता भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com