Rahul Gandhi News : सावरकरांविषयी पुन्हा असे बोलला तर..! सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींची खरडपट्टी

Rahul Gandhi’s Statement on Veer Savarkar : न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
Rahul Gandhi, Supreme Court
Rahul Gandhi, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court News : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चांगलीच खरडपट्टी काढली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींना फटकारले. पुन्हा अशी विधाने केली तर आम्ही स्वत:हून त्याची दखल घेऊ, असा इशाराही कोर्टाने त्यांना दिला आहे.

न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्रातील अकोला येथील एका सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकारांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत वकील नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशाती सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली.

Rahul Gandhi, Supreme Court
Sharad Pawar Party : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड; जयंत पाटलांकडून प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त

अलाहबाद हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने राहुल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल यांना धारेवर धरले. तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात. तुम्ही अशी विधाने का करत आहात? तुम्ही महाराष्ट्रात जाऊन सावरकर यांच्याविषयी बोलता, जिथे त्यांची पूजा केली जाते. तुम्ही असे करायला नकोय, असे कोर्ट म्हणाले.

राहुल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांना कोर्टाने विचारले की, महात्मा गांधींनीही इंग्रजांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी ‘तुमचा प्रामाणिक सेवक’ असे म्हटले होते, हे राहुल गांधींना माहिती आहे का? मग कुणी त्यांना इंग्रजांचे नोकर म्हटले तर चालेले का? त्यामुळे सावकरांविषयी असे बोलणे योग्य नाही. इंदिरा गांधींनीही सावकरांविषयी आदर व्यक्त केला होता, हे माहिती आहे का? त्यामुळे राहुल यांनी सावकरर आणि स्वातंत्र्यसैनिकांविषयी बेजबाबदार विधाने करू नयेत.

Rahul Gandhi, Supreme Court
Medha Patkar Arrest : मोठी बातमी : मेधा पाटकर यांना अटक, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झटका

सिंघवी यांनी यावर राहुल गांधी यांचा हेतून कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, असे कोर्टात सांगितले. त्यानंतरही कोर्टाने विचारणा केली की, तुमचा हेतू असा नव्हता तर बोललात का? आम्ही तुमच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यातील कारवाईला स्थगिती देऊ, पण पण अशी विधाने करण्यापासून आम्ही रोखू. तुम्ही यापुढे अशी विधाने केली तर आम्ही त्याची स्वत:हून दखल घेऊ, असा इशारा कोर्टाने दिला आहे. तसेच कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयालाही स्थगिती देत राहुल यांना दिलासा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com