Sharad Pawar Party : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड; जयंत पाटलांकडून प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त

Jayant Patil Dismissed from Key Role : विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात नाराजी वाढल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Jayant Patil, Sharad Pawar
Jayant Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजीचे वातावरण असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत आहेत. त्यातच शुक्रवारी पक्षातील मोठी घडामोड समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत. प्रवक्त्यांचे पॅनेल अचानक बरखास्त करण्यात आल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षांत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. पण विधानसभा निवडणुकीत अपेक्षित उमेदवार निवडून आले नाहीत.

Jayant Patil, Sharad Pawar
Medha Patkar Arrest : मोठी बातमी : मेधा पाटकर यांना अटक, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झटका

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात नाराजी वाढल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडणारे पक्षाचे 22 प्रवक्त्यांचे पॅनेल आहे. हे पॅनेलच बरखास्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

'पीटीआय'ने पक्षातील एका प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, संबंधित प्रवत्त्यांना जयंत पाटील यांच्याकडून पत्र आले आहे. त्यामुळे प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त केल्याचे म्हटले आहे. त्यामागचे कारण या पत्रात नमूद करण्यात आलेले नाही, अशी माहिती या प्रवक्त्याने पीटीआयला दिलेली आहे. कदाचित पक्षात नवीन नियुक्त्या केल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Jayant Patil, Sharad Pawar
Sharad Pawar : कोल्हापुरातून शरद पवारांनी ठोकला शड्डू; 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या शिलेदारांना दिल्या सूचना

दरम्यान, मागील काही महिन्यांत जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पाटील यांनी एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या मतदारसंघात नेले होते. त्यामुळे या चर्चांमध्ये भरच पडली होती. पण शरद पवारांसह जयंत पाटील यांनीही या चर्चा खोडून काढल्या होत्या. आपण शरद पवारांसोबत राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com