Supreme Court : नायब राज्यपालांना 10 नगरसेवक नियुक्तीचे अधिकार; केजरीवाल सरकारला 'सुप्रीम' झटका

Delhi Government Governor MCD Councilor : सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे दिल्ली सरकारला झटका बसला आहे. नायब राज्यपाल नामनिर्देशित दहा नगरसेवकांची नियुक्ती करू शकतात.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिल्लीतील केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. नायब राज्यपालांचे नामनिर्देशित दहा नगरसेवकांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोर्टाने कायम ठेवला आहे. तसेच या नियुक्तीसाठी सरकारची सहमती आवश्यक नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

नायब उपराज्यपाल सरकारच्या सल्ल्याशिवाय दहा नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करू शकतात, त्यांना तो अधिकार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या नगरसेवकांच्या नियुक्तीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.

Supreme Court
Brijbhushan Singh : ...तर उत्तर प्रदेशात भूकंप होईल! भाजप नेत्याचा थेट योगींना इशारा

नगरसेवकांच्या नियुक्ती रखडल्याने स्थायी समितीची निवडणूकही रखडली होती. कारण हे नगरसेवकही यामध्ये मतदान करतात. दिल्ली महापालिकेत आपचे 134 तर भाजपचे 104 निवडून आलेले नगरसेवक आहेत. याशिवाय दहा नायब राज्यपाल नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त केले जातात. आता नायब राज्यपला विनक कुमार सक्सेना यांच्याकडून या नियुक्ती केल्या जातील.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नायब राज्यपालांना दहा नगरसेवकांच्या नियुक्तीचे अधिकार देण्याचा निकार दिला. या नगरसेवकांची नियुक्ती राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राज्याचे मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ला त्यांना बंधनकारक नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

Supreme Court
Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 91 जणांचा मृत्यू; भारतीय विद्यार्थ्यांना सतर्कतेचं आवाहन

दिल्ली महापालिकेत आपचे बहुमत आहे. त्यामुळे सध्यातरी पक्षाला कोणताही धोका नाही. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथून टाकली. भाजपला 104 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसचे केवळ नगरसेवक निवडून आले.

दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल म्हणजे भारतीय लोकशाही धक्का देणारा आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला बायपास करून नियुक्ती करणे योग्य नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com