CJI Bhushan Gavai update : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची माहिती समोर; घटनेनंतर CJI गवई काय म्हणाले?

Lawyer Attempts Shoe Attack on CJI Bhushan Gavai in Supreme Court : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खगे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. हा न्यायपालिकेच्या सन्मानावर हल्ला असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
Security personnel intervening after lawyer Rakesh Kishore attempted to throw a shoe at Chief Justice Bhushan Gavai inside the Supreme Court.
Security personnel intervening after lawyer Rakesh Kishore attempted to throw a shoe at Chief Justice Bhushan Gavai inside the Supreme Court.Sarkarnama
Published on
Updated on

CJI Bhushan Gavai’s Response After the Incident : सुप्रीम कोर्टात सोमवारी सकाळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच धक्कादायक घडला घडली. एका वकिलाने त्यांच्यासमोर जात अंगावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोर्टात एकच खळबळ उडाली होती. कोर्टातील सुरक्षारक्षक व इतरांनी नंतर त्या वकिलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या वकिलाची माहिती आता समोर आली आहे.

राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. ते 71 वर्षांचे असून कोर्टात वकिलीचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सुप्रीम कोर्टात वकील आणि क्लार्कसाठी दिले जाणारे कार्डही या वकिलाकडे होते. एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सुप्रीम कोर्टातील बारचे 2011 पासूनच सदस्य आहेत. ते कोर्टातील ज्येष्ठ वकील म्हणून परिचित आहेत.

कोर्ट क्रमांक एकमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळाने राकेश किशोर हे बेंचसमोर गेले आणि पायातील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रोखण्यात आले. सुरक्षारक्षक त्यांना बाहेर घेऊन जात असताना वकिलाने सनातन धर्माचा अपमान हिंदूस्तान सहन करणार नाही, अशा घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शी वकिलांकडून सांगण्यात आले.

Security personnel intervening after lawyer Rakesh Kishore attempted to throw a shoe at Chief Justice Bhushan Gavai inside the Supreme Court.
Rahul Gandhi News : मारहाणीवेळी युवकाने घेतले राहुल गांधींचे नाव, हल्लेखोरांनी आम्ही ‘बाबा’वाले असल्याचं सांगत केली हत्या

कोर्टात हा गोंधळ सुरू असताना सरन्यायाधीश गवई अत्यंत शांत होते. संबंधित वकिलाला सुरक्षारक्षकांनी बाहेर नेल्यानंतर कोर्टात कुजबुज सुरू झाली होती. त्यावेळी सरन्यायाधीशांनी याकडे लक्ष देऊ नका, असे सांगत कामकाज पुन्हा सुरू करण्याचे सूचविले. अशा गोष्टींनी मी प्रभावित होत नाही, अशी सूचक टिप्पणीही सरन्यायाधीश गवई यांनी या घटनेनंतर लगेचच केली.

दरम्यान, या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे. सुप्रीम कोर्ट अडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशननेही ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत संबंधित वकिलावर कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खगे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. हा न्यायपालिकेच्या सन्मानावर हल्ला असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

Security personnel intervening after lawyer Rakesh Kishore attempted to throw a shoe at Chief Justice Bhushan Gavai inside the Supreme Court.
Bihar Assembly Election : बिहारमध्ये कधी होणार निवडणूक, कोणते बदल? ज्ञानेश कुमार यांनी दिली महत्वपूर्ण माहिती...

आपल्या गुणवत्तेने, सचोटीने आणि चिकाटीने देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत पोहोचलेल्या विद्यमान सरन्यायाधीशांना अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे ही एक गंभीर संदेश देणारी घटना आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सामाजिक अडथळे तोडणाऱ्या व्यक्तीला धमकावण्याचा आणि अपमानित करण्याचा हा प्रयत्न दिसतो. अशा निर्बुद्ध कृत्यावरून गेल्या दशकात द्वेष, कट्टरता आणि धर्मांधतेने आपल्या समाजाला कसे ग्रासले आहे हे दिसून येते, अशी टीका खर्गे यांनी केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com