
New Delhi News : वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरबाबत सुप्रीम कोर्टानं सोमवारी(ता.21) अखेर मोठा निर्णय घेतला आहे.यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपात पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.आता न्यायालयानं सुनावणीवेळी पूजा खेडकरला (Pooja Khedkar) पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात पूजा खेडकरविरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायालयानं पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देतानाच ती जोपर्यंत पोलिसांना चौकशीत सहकार्य करेल, तोपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे हा पूजा खेडकरसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) पूजा खेडकर प्रकरणाची पुढील सुनावणी ही 21 मे रोजी होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालयानं पोलिसांना आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलं आहे. पण याचदरम्यान,आता पूजा खेडकरच्या वकिलानं ती यापुढे सुनावणीवेळी हजर राहील, तसेच चौकशीतही पूर्णपणे सहकार्य करेल अशी माहिती न्यायालयाला दिली आहे.
उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणात पूजाला सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा देतानाच अटकेपासून संरक्षण बहाल केलं आहे. मात्र, पूजा खेडकरला याचवेळी न्यायालयानं 2 मे रोजी क्राइम ब्रांच समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले आहेत.
वादग्रस्त आणि बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढत आहेत. सध्या त्यांच्या क्रिमिलियर सर्टिफिकेटची सध्या तपासणी सुरू आहे. महसूल यंत्रणेकडून त्याबाबत गेले तीन महिने सखोल माहिती संकलित करण्यात आली होती. या संदर्भात प्रमाणपत्र रद्द का करू नये असं न्यायालयानं काही दिवसांपूर्वी सुनावणीवेळी म्हटलं होतं.
पूजा खेडकरला राज्य शासनाने यापूर्वीच बडतर्फ केले आहे.त्यांच्याविरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तक्रार आहे. त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला देखील प्रलंबित आहे. पूजा खेडकर सध्या हंगामी जामिनावर बाहेर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.