
Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची ही चर्चा सुरू असतानाच याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच 1991 साली पहिल्यांदाच माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या निमित्ताने शिवसेनेला फुटीचा पाहिला धक्का बसला. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत 18 आमदार बाहेर पडणार होते. पण ऐनवेळी 12 आमदारांनी कच खाल्ली आणि सहा आमदारच त्यांच्यासोबत बाहेर पडले. त्यानंतरच्या काळात अनेक वेळा शिवसेनेला बंडाला सामोरे जावे लागले. त्यानंतर शिवसेना अन् बंडखोरी असा एक इतिहासच झाला आहे.
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेची (Shivsena) स्थापना केली होती. 1966 ते 2002 पर्यंत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. सत्तेत असो वा नसो महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणातून बाळासाहेबांना बाजूला ठेवून राजकारण करणे काॅंग्रेससह कोणत्याही विरोधकांना धडकी भरविणारे होते. नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचे मोठे गारुड होते. त्यामुळेच प्रत्येक जण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झाला होता. त्या काळात आलेल्या बाळासाहेब नावाच्या वादळाने विरोधकांची नौका किनाऱ्यावर लावली.
1966 ते 2002 पर्यंत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. सत्तेत असो वा नसो महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणातून बाळासाहेबांना बाजूला ठेवून राजकारण करणे काॅंग्रेससह कोणत्याही विरोधकांना धडकी भरविणारे असेच होते. बाळासाहेब ठाकरे नावाच्या तुफानाला सोबत घेऊन भाजपने काॅंग्रेससमोर एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून शिवसेना-भाजप युतीला उभे करण्यात यश मिळविले. त्यानंतर 1995 साली महाराष्ट्रात सर्वप्रथम भाजप (BJP)-शिवसेना युतीचे सरकारही आले होते.
राज्यात युतीचे सरकार येण्यापूर्वीच शिवसेनेला पहिल्यांदाच बंडाला सामोरे जावे लागले. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, राहुल नार्वेकर आणि शेवटी राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्ष सोडून गेलेले आमदार व खासदार अशी अनेक नेते शिवसेना सोडल्यानंतरही राजकारणात टिकून आहेत. तर शिवसेना अन बंडखोरी असा एक इतिहास झाला आहे. शिवसेना सोडून बंडखोरी करणारा पुन्हा निवडून येत नव्हता, हा इतिहास खराही आहे. निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही काही जण राजकारणात पुन्हा यशस्वी झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरेंचा मोठा दबदबा होता. त्यांनी कधीच त्यांचे वर्चस्व कमी होऊ दिले नाही. शिवसेनेत असल्यापासून छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची ओळख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक अशी होती. मात्र, 1985 पासून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला.
मुंबईचे महापौर केल्याने होते नाराज
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना बाळासाहेब ठाकरे ही जबाबदारी देतील, असे भुजबळांना वाटले, पण तसे झाले नाही. ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे समजताच भुजबळांना धक्का बसला. यानंतर भुजबळांना राज्याच्या राजकारणातून काढून शहराच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले. त्यांना मुंबईचे महापौर करण्यात आले. त्यामुळे ते काहीकाळ नाराज होते.
शिवसेनेच्या सहा आमदारांनी सभापतींना दिले होते पत्र
5 डिसेंबर 1991 रोजी भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात बंड केले. शिवसेना-ब नावाचा वेगळा गट स्थापन करून मूळ शिवसेनेपासून वेगळे होत असल्याचे पत्र शिवसेनेच्या सहा आमदारांनी सभापतींना दिले. त्यानंतर भुजबळ यांनी समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच भुजबळांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले. ठाकरे कुटुंबाची कुठून तरी फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती.
18 आमदार बाहेर पडणार होते
भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत 18 आमदार बाहेर पडणार होते. पण ऐनवेळी 12 आमदारांनी कच खाल्ली आणि सहा आमदारच त्यांच्यासोबत बाहेर पडले. मात्र, भुजबळ वगळता आज राजकारणात कोणताही आमदार टिकलेला नाही.
विधानसभा निवडणुकीत स्वीकारावा लागला होता पराभव
छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या सहा आमदारांसह बंड केले होते. त्यांनी केलेले हे बंड शिवसैनिकाच्या पचनी पडले नव्हते. त्यामुळे बंडानंतर कित्येक दिवस त्यांना भूमिगत राहावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसने जवळ करीत गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद दिले होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकर या शिवसैनिकांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. त्यामुळे त्यांची अवस्था वाईट झाली होती. त्यांच्या सोबत गेलेल्या सहा आमदारापैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही.
त्यानंतरच्या काळात 1998 साली काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांनी स्थापना केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांची साथ दिली. त्यामुळे राज्यात 1999 साली आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.