गॅस सिलिंडर महागला अन् 42 टक्के नागरिकांनी पुन्हा पेटवली चूल

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
LPG
LPGSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अखेर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्यात आली आहे. यानंतर एलपीजी सिलिंडरचे (LPG Cylinder) दर कमी करण्याची जोरदार मागणी करण्यात येऊ लागली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे 42 टक्के लोकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याची धक्कादायक बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

LPG
हात जोडून माफी मागितल्यानंतर अखेर भाजपच्या माजी मंत्र्याची सुटका

चालू वर्षभरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना बसणाऱ्या महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत एलपीजी सिलिंडरचा दर जवळपास 900 रुपयांवर पोचला आहे. एका सिलिंडरसाठी 899.50 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात नुकतीच तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे हा 19 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत आता 2 हजार 5 रुपयांना मिळत आहे. आधी त्याची किंमत 1 हजार 734 रुपये होती. याचा मोठा फटका हॉटेलचालकांना बसत आहे.

गावागावांत उज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी देण्यात आल्यानंतर लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचा दावा मोदी सरकार करीत आहे. आता समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे लोक आता पुन्हा लाकडाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत. झारग्राम आणि पश्चिम मिदनापूरमधील 100 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यात 42 टक्के लोकांनी पुन्हा स्वयंपाकासाठी चुलीचा वापर सुरू केल्याचे समोर आले आहे. गॅस सिलिंडरचा खर्च करण्याची क्षमता नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

LPG
भाजप नेत्याची आधी हात जोडून माफी अन् नंतर म्हणाला, मी तर रामराम केला!

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते.

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com