Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल यांनी उचललं मोठं पाऊल; राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं पत्र

Swati Maliwal Assault Case Big Update : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणात मोठं पाऊल उचलत थेट इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहिली आहेत.
Arvind Kejriwal, Swati Maliwal
Arvind Kejriwal, Swati MaliwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : 'आप'च्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणानं दिल्लीचं राजकारण तापलं आहे.दिल्लीतील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal)मारहाण प्रकरणाने भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले असून आप बॅकफूटवर गेले आहे.

स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे माजी खासगी सचिव विभव कुमारयांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी विभव कुमार यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक देखील केली आहे.आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणात मोठं पाऊल उचलत थेट इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहिली आहेत. यामध्ये राहुल गांधी, शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.या पत्राद्वारे मालीवाल यांनी या नेत्यांकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडियाच्या X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.त्यात त्या म्हणतात, मी आठ वर्षे दिल्ली महिला आयोगा (DCW) चे अध्यक्षपद भूषवले आहे. या कालावधीत मी महिला आणि मुलांविरोधातील 1.7 लाखांहून अधिक तक्रारी ऐकल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Arvind Kejriwal, Swati Maliwal
Chhagan Bhujbal : संजय राऊतांशी भेट झाली? छगन भुजबळांनी कधी काय झालं, ते सगळंच सांगितलं

'माझ्या चारित्र्याबाबत वाईट...'

पण दुर्दैवाने आपण खासदार झाल्यानंतर 13 मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या पीएने मला मारहाण केली. या घटनेनंतर मी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्धार केला.मात्र, अशा परिस्थितीत मला साथ देण्याऐवजी माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते माझ्याच चारित्र्यावर नकारात्मक बोलू लागले आहेत, असेही मालीवाल आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

कोणाचाही दबाव न जुमानता,कोणाच्याही पुढे न झुकता मी महिला आयोगाला खूप उच्च स्थानावर पोहोचवले आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे मला आधी मुख्यमंत्र्यांच्या घरी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर माझ्या चारित्र्याबाबत वाईट बोलण्यात आले.

Arvind Kejriwal, Swati Maliwal
Kolhapur Shaktipeeth Highway : 'खासदारकी' मिळाल्यानंतर शाहू महाराज इन 'अ‍ॅक्शन'; शेतकऱ्यांसाठी काढला मोर्चा

'मला तुमची भेट घेण्यासाठी वेळ देण्यात यावा...'

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे भेटीसाठी वेळही मागितला आहे.त्या म्हणाल्या, प्रतिष्ठा,चारित्र्य आणि विश्वासार्हता यांवरुन मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर अपप्रचार सुरू करण्यात आला. माझ्याविरुद्ध पसरवलेल्या खोट्या गोष्टींमुळे मला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत.

या विषयावर चर्चा करण्यासाठी मला तुमची भेट घेण्यासाठी वेळ देण्यात यावा,असे मालीवाल यांनी लिहिले. तसेच, मी तुमच्या उत्तराची वाट पाहणार असल्याचेही स्वाती मालीवाल यांनी पत्रात म्हटलं आहे.

Arvind Kejriwal, Swati Maliwal
Rushikonda Palace : आधी बुलडोझर अन् आता 400 कोटींचा 'पॅलेस' ; CM चंद्राबाबू नायडूंचा जगन मोहन रेड्डींना दुसरा मोठा दणका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com