Kolhapur Shaktipeeth Highway : 'खासदारकी' मिळाल्यानंतर शाहू महाराज इन 'अ‍ॅक्शन'; शेतकऱ्यांसाठी काढला मोर्चा

Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
Nagpur Goa Shaktipeeth highway protested
Nagpur Goa Shaktipeeth highway protestedSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. हा महामार्ग रद्द करावा, यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकातून नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते.

नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर येथे शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील, (Satej Patil) संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहभाग घेतला होता.

Nagpur Goa Shaktipeeth highway protested
Dhairyasheel Mane : माझा दर कमी म्हणून 'मटका' लागला; खासदार धैर्यशील मानेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा महामोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही, असा निर्धार या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेला हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जात आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

Nagpur Goa Shaktipeeth highway protested
Shashikant Shinde Aggresive : 'मी काय आहे, ते दाखवून देणार...’ ; शशिकांत शिंदेंनी साताऱ्यातील नेत्यांना भरला दम

केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकरी (Farmer) भूमीहीन होतील, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. कोकणा जाण्यासाठी अनेक मार्ग असताना केंद्र सरकारला आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी आहे, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. यावेळी केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देखील देण्यात आल्या.शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोवर मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीष फोंडे यांनी दिला. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील तसेच शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com