Operation Jhaadu : PM मोदींकडून ‘ऑपरेशन झाडू’ला सुरूवात! दिल्लीत राजकारण तापलं...

Arvind Kejriwal News : केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान मोदींसह भाजपवर गंभीर आरोप केले आहे. त्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यानंतर दिल्लीत आपविरुध्द भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे.
Pm Narendra Modi Arvind Kejriwal
Pm Narendra Modi Arvind KejriwalSarkarnama

New Delhi : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत आपविरुध्द भाजप संघर्ष पेटला असून राजकारण चांगलंच तापलं आहे. (Operation Jhaadu) आपने रविवारी भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. त्याआधी बोलताना केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

विभव कुमारांना (Bibhav Kumar) अटक केल्यानंतर आपचे (AAP) नेते आक्रमक झाले आहे. रविवारी मोर्चाआधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, भाजप आणि पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) ऑपरेशन झाडू सुरू केले आहे. आपच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्याचे हे ऑपरेशन आहे. आपची बँक खाती गोठवली जातील. (Swati Maliwal assault Case)

Pm Narendra Modi Arvind Kejriwal
Adhir Ranjan Chowdhury : ममता बॅनर्जींशी लढायचं असेल तर आमच्याकडे या; काँग्रेसच्या चौधरींना भाजपची ऑफर!

निवडणूक झाल्यानंतर आपची बँक खाती गोठवली जाणार असल्याचे ईडीच्या वकिलांना आधीच कोर्टात सांगितले आहे. आपल्याला ऑफिसमधून रस्त्यावर आणले जाईल. नेत्यांना अटक करून जेलमध्ये टाकतील, हे तीन प्लॅन भाजपचे आहेत. मला जेलमध्ये जाऊ द्यायचं असेल तर भाजपला (BJP) मतदान करा. नाहीतर आपची निवड करा, असे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज त्यांनी माझ्या पीएला अटक केली. आता ते राघव चड्ढा, आतिशी, सौरभ भारद्वाज यांना अटक करतील, असा दावाही केजरीवाल यांनी केला. दरम्यान, केजरीवाल्यांच्या भाषणानंतर आप कार्यालय ते भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चा स्वत: केजरीवाल सहभागी झाले असून पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात आहेत.

दिल्ली पोलिसांनी भाजपच्या कार्यालय परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आपने मोर्चासाठी परवानगी घेतली नसल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून मोर्चा भाजप कार्यालयापर्यंत जाऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. दिल्लीत पुढील टप्प्यात लोकसभेची निवडणूक आहे. त्यासाठी मोर्चात सहभागी नेत्यांना अटक झाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीवरही होऊ शकतो.

Pm Narendra Modi Arvind Kejriwal
NDA Vs INDIA: उत्तर प्रदेशात पुन्हा 'NDA'चा शोर की 'INDIA' चा जोर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com