

Lok Sabha Election reforms : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरू असतानाच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांची लोकसभा अध्यक्षांनीच फिरकी घेतली. बजरंग सोनवणे बोलत असतानाच त्यांना थेट तुम्हाला तुमच्या नेत्यांची जागा घ्यायची आहे का, असा सवाल केला. त्यावर सोनवणे यांनीही लगेच उत्तर दिले.
निवडणूक सुधारणांवर सोनवणे यांना बोलण्याची संधी मिळाली. केवळ अडीच मिनिटेच तो बोलले. मी एसआयआरवर बोलण्यासाठी उभा आहे. त्यावर बोलण्यासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. मी खूप साऱ्या लोकांकडून शिकत असतो. मी पहिल्यांदाच निवडून आलेला सदस्य आहे, असे सांगत सोनवणे आपले म्हणणे मांडत होते. तेवढ्यात तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी त्यांना तुमचा नेमका मुद्दा मांडण्यास सांगितले.
तुमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी खूप सविस्तरपणे यावर भाष्य केले आहे, अशी आठवण पाल यांनी करून दिली. त्यावर सोनवणे यांनी मलाही थोडी त्यावर बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर पाल यांनी तुम्ही तुमच्या नेत्यांची जागा घेणार, अशी विचारणा केली. सोनवणे यांनी लगेचच मी त्यांची जागा नाही, कुणाचीच जागा घेऊ इच्छित नाही. मी मला ज्या जागेवर बसविले आहे, तीच जागा खूप आहे, असे म्हटले.
सोनवणे यांनी पुढे बोलण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांनी एसआयआरसाठी देण्यात आलेला एक महिन्याचा कालावधी वाढवून तीन महिन्यांचा करण्याची मागणी केली. मतदारांना अधिकाधिक संधी मिळायला हवी. बोलायचं खूप आहे, पण थांबतो, असे सांगत सोनवणे यांनी आपली म्हणणे पूर्ण केले. दरम्यानच्या काळात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आसनावर विराजमान झाले होते.
बिर्ला यांनी सोनवणे यांना थांबण्यास सांगितल्यानंतर सोनवणे यांनी त्यांच्याविषयी बोलण्यास सुरूवात केली. सर, देवाची खूप रूपं असतात. पण तुमची दोन रूपं आहेत. तुम्ही जेव्हा येता तेव्हा उजवीकडे बघून हसता आणि डावीकडे रागवता, असे मिश्कीलपणे बोलत सोनवणे यांनी हात जोडत माफी मागितली अन् मी आपल्याला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले. सोनवणे यांच्या या विधानावर अध्यक्षांसह सभागृहातील इतर सदस्यांनाही हसू आवरले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.