BJP Politics : भाजपकडून दोन नेत्यांची हकालपट्टी; अण्णामलाई-तमिलीसाईंवर आगपाखड करणं भोवलं

Lok Sabha Election Tamil Nadu BJP K Annamalai : लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याने नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
K Annamalai, Tamilisai Soundarajan
K Annamalai, Tamilisai SoundarajanSarkarnama

Tamil Nadu : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षांतर्गत कलह वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आणि ज्येष्ठ नेत्या तमिलीसाई सुंदरराजन यांच्यातील वादाचे पडसाद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीच्या स्टेजवरही दिसले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तमिलीसाई यांना फटकारल्याची चर्चा होती. त्यानंतर आता भाजपने राज्यातील दोन नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातील सर्व पदांवरून मुक्त करण्यात आले असून एका नेत्याला पक्षातून एक वर्षांसाठी निलंबित केले आहे.

K Annamalai, Tamilisai Soundarajan
OBC, SC, ST Reservation : वाढीव आरक्षणाचा कायदा हायकोर्टाकडून रद्द; नितीश कुमारांना मोठा झटका

कल्याण रमण आणि त्रिची सुर्या अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. भाजपच्या राज्यातील पराभवानंतर या नेत्यांनी अण्णामलाई आणि तमिलीसाई यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यांनी पराभवाचे खापर या दोघांवर फोडले होते.

तमिळनाडू भाजपच्या बौध्दिक सेलचे पदाधिकारी असलेल्या कल्याण रमण यांना एक वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्रिची सुर्या हे ओबीसी सेलचे सरचिटणीस होते. त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. दोघांवर शिस्तभंगाचा कारवाई करण्यात आली आहे.

कोणताही पुरावा नसताना अण्णामलाई व कार्यकर्त्यांविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा ठपका कल्याण रमण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर त्रिची सुर्या यांनी तमिलीसाई यांना विविध मुलाखतींमध्ये लक्ष्य केले होते.  

दरम्यान, तमिलीसाई आणि सुंदरराजन यांच्यातील वादावर नुकताच पडदा पडला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नायडू यांच्या शपधविधीवेळी तमिलीसाठी स्टेजवर आल्यानंतर शाह यांनी त्यांना फटकारल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

K Annamalai, Tamilisai Soundarajan
Video UGC NET : अखेर UGC NET परीक्षा रद्द, गैरव्यवहार प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय

तमिलीसाई यांनी मात्र शाह यांनी आपल्या मतदारसंघात यापुढे चांगले काम करण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तमिलीसाई यांनी राज्यातील पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे अण्णामलाई यांच्यावर फोडल्याने या दोन नेत्यांमधील वाद पुढे आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com