Assembly Session : राष्ट्रगीताचा अपमान! संतापलेले राज्यपाल भाषण न करताच विधानसभेतून गेले

Tamil Nadu Assembly Winter Session Governor RN Ravi CM MK Stalin : राज्यपाल आर. एन. रवी यांनी सरकारमध्ये यापूर्वीही अनेकदा खटके उडाले आहेत.
Tamil Nadu Assembly
Tamil Nadu AssemblySarkarnama
Published on
Updated on

Chennai News : तमिळनाडू विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून वादानेच सुरूवात झाली. पहिल्या दिवशी राज्यपालांनी भाषण न करताच विधिमंडळातून काढता पाय घेतला. राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने राज्यपालांनी भाषण केले नाही, असे स्पष्टीकरून राजभवनकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार विरुध्द राज्यपाल असे चित्र पाहायला मिळाले.

काय घडले विधानसभेत?

तमिळनाडू विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. पंरपरेप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होते. विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यगीत लावण्यात आले. मात्र, त्यानंतर राष्ट्रगीत लावण्यात आले नाही, त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचे कारण देत राज्यपाल रवी तिथून भाषण न करताच निघून गेले.

Tamil Nadu Assembly
Mukesh Chandrakar Murder: धक्कादायक! डोक्यावर 15 जखमा, लिव्हरचे चार तुकडे, मान मोडलेली..; पत्रकाराची निघृण हत्या, ठेकेदाराला अटक

राजभवनचा खुलासा

राजभवनकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यामध्ये म्हटले आहे की, विधिमंडळात राज्यपाल आल्यानंतर केवळ राज्यगीत लावण्यात आले. अशा प्रसंगी नेहमी राष्ट्रगीत लावले जाते. राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना याबाबत आठवण करून दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्यपाल नाराज होऊन निघून गेले.

मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राज्यपालांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या या कृतीला बालिश म्हटले आहे. संविधानानुसार, राज्यपालांनी विधिमंडळात अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य सरकारने दिलेले भाषण वाचणे अपेक्षित असते. पण त्यांच्याकडून याचे सतत उल्लंघन होते. मागील वर्षी त्त्यांनी भाषण काही बदल केले तर यावेळी वाचलेच नाही. राजकीय आणि कायदेशीर जबाबदारी पार पाडता येत नसतील तर एखाद्याने त्या पदावर का राहावे, असे प्रश्नही स्टॅलिन यांनी सोशल मीडियातून उपस्थित केला आहे.

Tamil Nadu Assembly
Delhi Vidhan Sabha Election : दीड कोटी मतदार ठरवणार दिल्ली कुणाची; निवडणूक आयोगाकडून मतदार यादी जाहीर

विरोधकांचे आंदोलन

एकीकडे राज्यपाल आणि सरकारमध्ये जुंपलेली असताना विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेने विधानसभेत अण्णा विद्यापीठातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात आंदोलन केले. भाजपनेही याच मुद्द्यावरून विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस सरकारसाठी डोकेदुखी ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com