

Tamil Nadu News : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. अभिनेता विजय याची टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाकडून विजय यांच्या शपथविधीची तयारी करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी 118 आमदारांचा पाठींबा असल्याशिवाय सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे टीव्हीकेकडून विजय यांचा शपथविधी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
काल विजय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दाव केला होता. मात्र, त्यांच्याकडे 113 आमदारांची संख्या असून 118 आमदार असल्याशिवाय शपथविधीसाठी आमंत्रित करणार नसल्याची भूमिका राज्यपाल राजेंद्र कार्लेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच तामिळनाडूमध्ये निर्माण झाला आहे.
आज देखील विजय यांनी राज्यपाल यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र, राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी पूर्ण 118 सदस्यांचा पाठींबा दाखवून द्या, असे राज्यपाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज विजय यांचा शपथविधी होणार नसल्याचे समोर आहे.
टीव्हीकेकडून बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. टीव्हीकेचे 108 आणि काँग्रेसचे पाच असे मिळून 113 सदस्यांचे विजय यांना पाठींबा आहे. दरम्यान, सीपीएमचे दोन सदस्य विजय यांना पाठींबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बहुमत हे विधानसभेत सिद्ध केले जाते. त्यामुळे राज्यपालांनी विजय याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले पाहिजे, विजयचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, अशी चर्चा आहे. मात्र, राज्यघटना तज्ज्ञांच्या मते राज्यपालांची भूमिका ही योग्य आहे. जोपर्यंत त्यांना कागदावर स्पष्ट बहुमत दिसत नाही तो पर्यंत तो कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकत नाही. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी हे आवश्यक आहे. राज्यपालांवर घटनेने सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावेच असे बंधन नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.