woman IAS officer : सत्ताधारी पक्षाचा आमदार गजाआड: महिला IAS अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई; 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत मुक्काम!

Woman IAS officer harassment News : कल्लाकुरिची येथील महिला पोलीस ठाण्यात संबंधित महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली.
MLA arrested
MLA arrested Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chennai News : तामिळनाडूमध्ये महिला IAS अधिकाऱ्याचा लैंगिक छळ करणे सत्ताधारी तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे आमदाराला पोलिसांनी गजाआड केले. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. सी. अरुल विग्नेश असे अटक करण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे. अटकेनंतर कोर्टाने त्यांना 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी कुड्डालोर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्लाकुरिची येथील महिला पोलीस ठाण्यात संबंधित महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी सत्त्ताधारी पक्षाच्या आमदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधित महिला अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आमदार विग्नेश यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात आमदारांनी त्यांच्या कपड्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

त्याशिवाय हा आमदार संबंधित महिला जिल्हाधिकारी यांना व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवणे आणि रात्रीच्या वेळी महिला अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मात्र, आमदार विग्नेश यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात राजकीय हेतूने आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयानेही सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.

MLA arrested
Pune BJP MP : पुण्याच्या खासदाराला केंद्रात महत्त्वाचं पद; राज्यसभेचे कामकाज चालविण्याची मिळणार संधी

या घटनेनेनंतर महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. यावरून कल्लाकुरिची येथील महिला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75, 78, 79 आणि 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने POSH कायद्यांतर्गत चार सदस्यांची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी काकरला उषा या समितीच्या अध्यक्ष आहेत. 60 दिवसांत अहवाल देण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.

MLA arrested
NCP Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा, पक्षाने जाहीर केली भूमिका; स्पष्टच सांगितले, 'त्या' ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.