Karur Stampede SIT: तमिळ सुपरस्टार विजयच्या अडचणी वाढल्या! चेंगराचेंगरी प्रकरणी हायकोर्टानं झाप झाप झापलं अन् SITचे दिले आदेश

Karur Stampede SIT: तमिळ सुपरस्टार आणि तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) प्रमुख विजय याची करुर चेंगराचेंगरी प्रकरणी मद्रास हायकोर्टात चांगलीच खरडपट्टी काढली.
Actor Vijay
Actor Vijay
Published on
Updated on

Karur Stampede SIT: तमिळ सुपरस्टार आणि तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) प्रमुख विजय याची करुर चेंगराचेंगरी प्रकरणी मद्रास हायकोर्टात चांगलीच खरडपट्टी काढली. चेंगराचेंगरीच्या घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन तो निघून गेल्याचा ठपकाही हायकोर्टानं त्याच्यावर ठेवला. तसंच या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देशही दिले.

Actor Vijay
Nashik Police: नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! आमदारांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

हायकोर्टानं काय म्हटलं?

मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठानं करुर चेंगराचेंगरी प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी असरा गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. यावेळी कोर्टानं विजयवर ताशेरे ओढताना म्हटलं की, चेंगराचेंगरीनंतर तिथून निघून जाणं आणि याबद्दल कुठलीही सद्भावना व्यक्त न करणं हे अभिनेत्याची मानसिकता दर्शवतं. न्या. सेन्थिलकुमार यांनी म्हटलं की, विजयच्या सभेला इतकी मोठी गर्दी होते त्यात ४१ जणांचा जीव जातो कारण ही सभा त्यांनी व्यवस्थित हाताळली नाही. उलट राज्य शासन अभिनेता विजयबद्दल उदारता दाखवत असल्याचंही हायकोर्टानं म्हटलं.

Actor Vijay
Nashik Police: नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! आमदारांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

यावेळी न्या. सेंथिलकुमार यांनी आयोजक आणि पोलिस दोघांनाही जबाबदारीबद्दल प्रश्न विचारला, म्हणाले, “कार्यक्रमाचा आयोजक म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का?” न्यायालयाने विजय यांच्याबद्दल राज्याने दाखवलेल्या उदारतेबद्दल संताप व्यक्त केला आणि असं निरीक्षण नोंदवलं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो घटनास्थळावरून 'गायब' झाला, अशा वर्तनाचा त्यांनी तीव्र निषेध केला. विशेषतः या चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलांचा मृत्यू झाला होता.

Actor Vijay
OBC Mahamorcha: मुख्यमंत्र्यांसोबतच्या उद्याच्या बैठकीवर ओबीसी नेत्यांचा बहिष्कार; नागपुरातील ओबीसींच्या महामोर्चाचं काय होणार?

त्याचबरोबर टीव्हीके नेते बस्सी आनंद आणि सीटीआर निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकांवर खंडपीठाने आदेश राखून ठेवले आहेत. या याचिकेवरील सुनावणीत तामिळनाडू सरकारनं असा युक्तिवाद केला की चेंगराचेंगरी पक्षाच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळं झाली आणि नेत्यांचा यात बेजबाबदारपणा दिसून आला.

Actor Vijay
Target Pakistan: ...तर पाकिस्तान भुगोलावर राहणार नाही, लवकरच...; इंडियन आर्मीच्या प्रमुखांचा कडक इशारा

दरम्यान, खंडपीठानं असी निरीक्षण नोंदवलं की, एका मोठ्या मानवनिर्मित आपत्तीमुळं ४१ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यायालय याबाबत 'डोळे बंद' करू शकत नाही, 'मूक प्रेक्षक' म्हणूनही राहू शकत नाही किंवा 'जबाबदारी टाळू शकत नाही' असंही कोर्टानं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com