Tej Pratap Yadav : कोण आहे ‘राजद’चा ‘जयचंद’ अन् तेजप्रताप यांचा रोख नेमका कुणाकडे?

Who Is the ‘Jai Chand’ in RJD? - बिहारमधील राजकीय वर्तुळात याबाबत जवळपास सर्वांनाच कल्पना आह की...
Tej Pratap Yadav
Tej Pratap Yadavsarkarnama
Published on
Updated on

Tej Pratap Yadav hints at betrayal within RJD :  लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब आणि राष्ट्रीय जनता दलमधून काढण्यात आल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आज सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट आपल्या आई-वडिलांच्या नावाने शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्यासाठी माझे आई-वडील देवापेक्षीही श्रेष्ठ आहेत. तसेच त्यांनी हा देखील आरोप केला की, त्यांच्या वडिलांच्या पक्षात काही जयचंद सारखे लोक आहेत. 

 यानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा होवू लागली आहे की, अखेर राजदमध्ये तो कोण जयचंद आहे, ज्यामुळे तेजप्रताप यादव त्रस्त आहेत आणि त्यांना लालूंच्या कुटुंबातून आणि पक्षातून बाहेर जावे लागले.

तेजप्रताप यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे प्रिय मम्मी-पप्पा...माझं अवघे विश्व केवळ तुम्हा दोघांमध्येच आहे. माझ्यासाठी देवापेक्षाही जास्त आहात तुम्ही आणि तुम्ही दिलेला कोणताही आदेश. तुम्ही आहात तर सर्व काही आहे माझ्याकडे, मला केवळ तुमचा विश्वास आणि प्रेम हवं आहे आणखी काहीही नको. पप्पा तुम्ही जर नसता तर हा पक्षही नसता आणि माझ्यासोबत राजकारण करणारे जयचंद सारखे काही लालची लोकही नसते. मम्मी-पप्पी तुम्ही फक्त सदैव खूश रहा.

Tej Pratap Yadav
NCP Pune leadership : महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!

बिहारमधील राजकीय वर्तुळात याबाबत जवळपास सर्वांनाच कल्पना आह की, राजद मध्ये तेजप्रताप यादव यांचे संजय यादव यांचीशी पटत नाही. हरियाणाचे रहिवासी असणारे संजय यादव बिहारमधून राजदच्या कोट्यातून राज्यभा खासदार आहेत. ते तेजस्वी यादव यांचे अतिशय निकटवर्तीय आणि सल्लागर माले जातात.

याआधी अनेकदा तेजप्रताप यादव यांनी संजय यादव यांच्यावर टीका, टिप्पणी केली आहे. त्यांनी आरोप केला होता की, संजय यादव हे त्यांच्या अंगरक्षकास धमकावतात. एवढंच नाहीतर तेजप्रताप यादव यांनी असाही आरोप केला होता की, संजय यादव सोशल मीडियावर त्यांना अपशब्द वापरतात आणि भाऊ-बहिणींमध्ये भांडण लावतात.

Tej Pratap Yadav
Bihar Assembly Election : ‘APP’चा ‘I.N.D.I.A’आघाडीला झटका; बिहार विधानसभा स्वबळावरच लढवणार!

राजद सुप्रीमो लालू यादव यांनी रविवारी तेजप्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांचे बेजबाबदार वागणे आणि कौटुंबिक मूल्यांपासून व सार्वजनिक शिष्टाचार विचलित होण्याचा आरोप करत, त्यांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडण्याच निर्णयही घेतला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com