Tejashwi Yadav ON  Exit Poll : हादरवून टाकणाऱ्या 'एक्झिट पोल'नंतरही तेजस्वी यादव 'कुल'; म्हणाले, 'कुठलीच शक्यता नाही, अमित शाह...'

Bihar Election Exit Poll 2025 Tejashwi Yadav : बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येताना दिसत आहे. या पोलवर तेजस्वी यादव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Tejashwi Yadav ON  Exit Poll
Tejashwi Yadav ON  Exit Poll sarkarnama
Published on
Updated on

Tejashwi Yadav News : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल ईव्हीएमध्ये बंद झाले आहेत. मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. विक्रमी 70 टक्के मतदान या विधानसभा निवडणुकीत झाले आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलने मात्र विरोधकांची झोप उडवली आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने एनडीए पुन्हा सत्तेत येत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे महागठबंधन पराभूत होताना या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. मात्र, या पोलवर तेजस्वी यांनी अविश्वास दाखवला आहे.

तेजस्वी यादव म्हणाले, 'पंतप्रधान कार्यालय ठरवेत कोणते आकडे चॅनलेवर दाखवचे. अमित शाह ते आकडे लिहून देतात आणि मिडिया ते आकडे चालवते. पण नितीश कुमार यांचे सरकार वाचण्याची कुठलीच शक्यता नाही. '

'2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत तब्बल 72 लाख जास्त मतदान झाले आहे. ये मतदान नितीशकुमार यांना वाचवण्यासाठी नाही तर त्यांना सत्तेतून घालवण्यासाठी झाले आहे. हे मतदान सरकार बदलण्यासाठी होते आणि सरकार बदलणार आहे.', असे देखील तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे.

Tejashwi Yadav ON  Exit Poll
Eknath Shinde News : फुकटचा टाटा अन् नाव 'उबाठा', एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली!

दरम्यान, एक्झिट पोलबाबत नितीश कुमार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी केवळ स्मितहस्य केले. कुठलेही उत्तर न देता न निघून गेले. दरम्यान, भाजप उमेदवार रामकृपाल यादव म्हणाले, तेजस्वी यादव त्यांचा पराभव स्वीकारू शकत नाहीत म्हणूनच अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. त्यांनी जनादेश मान्य करायला हवा. एक्झिट पोल कधीच खोटे नसतात.

प्रशांत किशोरांना धक्का

एक्झिट पोलनुसार प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. काही एक्झिट पोलने त्यांना एकही जागा मिळत नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, काही एक्झिट पोलने जन सुराजला दोन ते तीन जागा मिळत आहे. यावर जन सुराजचे प्रवक्ता कुमार सौरभ म्हणाले, एक्झिट पोलला जनतेने पूर्वीच नाकाराले आहेत. कित्येक वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. जनतेने आमच्यासाठी निर्णय घेतला आहे तो समोर येईलच.

Tejashwi Yadav ON  Exit Poll
Forest department controversy : मंत्री विखे नाईकांच्या खात्यातील अधिकाऱ्यांवर संतापले; 'लोकांमध्ये आक्रोश, वन अधिकारी पिंजऱ्याच्या बाहेर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com