Abhijit Patil : मोठी बातमी ! शरद पवारांनी अभिजित पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

Abhijit Patil and Sharad Pawar : अभिजित पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Abhijit Patil and Sharad Pawar
Abhijit Patil and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी अभिजित पाटलांची निवड करण्यात आली आहे. अभिजित पाटील यांचा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे.

शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली होती. मात्र, पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना या संस्थेवर काम करण्याची संधी आता देण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijit Patil and Sharad Pawar
Bidri Sugar Factory Election : ‘बिद्री’च्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम; मुश्रीफ-घाटगे, महाडिक-पाटील आमने सामने

या अनुषंगानेच अभिजित पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे, तर अभिजित पाटलांना नव्याने उदयास आलेले साखर सम्राट म्हणून ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वीच अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवारांनी थेट आमदारकीच्या तिकिटाचे स्पष्ट संकेत पाटलांना दिले होते.

अभिजित पाटलांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांना मात दिली. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर अभिजित पाटील यांचे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात महत्त्व वाढलं आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Abhijit Patil and Sharad Pawar
Maratha Reservation : भुजबळांची जी मागणी, तीच सरकारची भूमिका : मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मोठी माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com