Telangana Assembly : ओवेसींची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती; भाजपचे आमदार खवळले, घेतला मोठा निर्णय

Pro-tem Speaker : ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून आज राज्यपालांनी शपथ दिली.
Akbaruddin Owaisi
Akbaruddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

AIMIM MLA Akbaruddin Owaisi : तेलंगणाच्या नव्या सरकारने ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपने ओवेसी यांच्या नियुक्तीला विरोध केला असून, आमदारांनी ओवेसींच्या समोर शपथ घेणार नाही, असे जाहीर केले आहे.

नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर सभागृहातील ज्येष्ठ आमदाराला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाते. नवीन आमदारांना शपथ देणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असून, रेवंथ रेड्डी यांचा नुकताच शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर या सरकारने ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष केले आहे.

Akbaruddin Owaisi
Mahua Moitra : एक कुत्रा ठरला महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीचे कारण; नेमकं काय आहे प्रकरण...

ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून आज राज्यपालांनी शपथ दिली. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किसन रेड्डी म्हणाले, वरिष्ठ नेत्याला हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याची परंपरा आहे. काँग्रेसने एमआयएमसोबत असलेल्या समझोत्यानुसार ओवेसी यांना नियुक्त केले आहे. आम्ही राज्यपालांकडे याबाबत तक्रार करणार आहोत. ओवेसी यांच्यामार्फत अध्यक्षांची निवडणूक होऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले, मी जिवंत असेपर्यंत ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही. २०१८ मध्येही एमआयएमच्या आमदाराला हंगामी अध्यक्ष करण्यात आले होते. त्यावेळी शपथ घेतली नव्हती. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी बीआरएसच्या मार्गाने जात आहेत का?

Akbaruddin Owaisi
Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदे होणार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, काय आहे कारण ?

विधानसभेत अनेक वरिष्ठ आमदार आहेत. त्यांनाही हंगामी अध्यक्ष बनवता आले असते, पण जाणीवपूर्वक अल्पसंख्याकांना खूश करण्याची ही मोठी चूक केली आहे. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत शपथ घेणार नाही. पुढे जे कोणी अध्यक्ष बनेल त्यांच्यासमोर आम्ही शपथ घेऊ, असे टी. राजा सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागांवर विजय मिळवला आहे, तर बीआरएसला ३९, भाजला आठ, एमआयएमला सात आणि सीपीआयला एक जागा मिळाली आहे.

(Edited By - Rajanand More)

Akbaruddin Owaisi
Nitesh Rane : महुआ मोईत्रांनंतर कुणाचा नंबर? नितेश राणेंनी ट्विट करत दिले संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com