Karne Shirisha News: म्हशीवाल्या शिरीषाने निवडणूक गाजवली अन् BRS च्या उमेदवाराला धोबीपछाड, पण...

Telangana Assembly Results 2023: कर्ने शिरीषाने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून चांगलेच रान पेटवले होते.
Telangana Assembly Results 2023:
Telangana Assembly Results 2023:Sarkarnama
Published on
Updated on

Telangana Assembly : तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्लापूर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघात बर्रेलेक्का (म्हशीची बहीण) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणीने निवडणुकीच्या मैदानात उतरत इतर राजकारण्यांची चांगलीच हवा टाइट केली होती. म्हशी राखणाऱ्या या तरुणीचे नाव कर्ने शिरीषा असून, तिने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून चांगलेच रान पेटवले होते. यासाठी तिला मतदारसंघातील युवकांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बर्रेलेक्काचा निवडणुकीमध्येही अपेक्षा भंगच झाला आहे.

व्हिडिओमुळे चर्चेत आली बर्रेलक्का

तेलंगणातील नागरकर्नूल जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील बर्रेलेक्का ही तरुणी तेलंगणा विधानसभेची निवडणूक लढवणारी सर्वात तरुण महिला उमेदवार होती. 26 वर्षीय शिरीषा बी.कॉम ग्रॅज्युएट असून, ती बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिने सोशल मीडियावर स्वत:चा नोकरीसाठी करावा लागणार संघर्ष याबद्दलचा विविध व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तिने ग्रॅज्युएट करून सरकारी नोकरी मिळण्यासाठी 3 वर्षे हैदराबादमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहात कशा प्रकारे कोचिंग क्लासेस लावले, त्यासाठी 25000 रुपयांची फी भरण्यासाठी कशा प्रकारे अडचणींवर मात केली. त्यानंतरही नोकर भरतीतील भ्रष्टाचार, पेपरफुटीची प्रकरणे, परीक्षा रद्द होण्याचे प्रकार आणि सरकारी अनास्था, याबाबत तिने विविध व्हिडिओंतून बेरोजगार तरुणांच्या प्रातिनिधिक स्वरूपात समस्या मांडल्या होत्या. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला होता.

नोकरी न मिळाल्याने पाळल्या म्हशी

शिरीषाला सरकारी नोकरीची तयारी करूनही नोकरी मिळवता आली नाही. अखेर तिला तिच्या गावी परतावे लागले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने अखेर म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. या दरम्यानच बेरोजगारी नशिबी आलेल्या शिरीषाने मी ग्रॅज्युएट असूनही मला म्हशी राखाव्या लागत असल्याची खंत व्यक्त करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. तिचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने कोल्लापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिरीषाची लढत ही सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे आमदार हर्षवर्धन रेड्डी आणि काँग्रेसचे उमेदवार जुपल्ली कृष्णा राव यांच्या विरोधात होती.

शिरीषाच्या भावाला मारहाण

शिरीषा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे समजात तिला पाठिंबा देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी अनेक बेरोजगार तरुणांनी शिरीषाचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तिला पाठिंबा देणाऱ्याच्या संख्येत वाढ होत होती. त्यातूनच शिरीषाचा प्रचार करत असतानाच सत्ताधारी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून शिरीषाच्या भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिरीषाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, या वेळी पोलिसांची भूमिका संशयाची असल्याचा आरोप शिरीषाच्या समर्थकांनी केला.

Telangana Assembly Results 2023:
Nilanga News : 'हाता'च्या मदतीशिवाय 'कमळ' कसं फुलणार ? काका-पुतण्यामध्ये रंगला कलगीतुरा

शिरीषाचा पराभव, बीआरएस उमेदवाराला फटका

शिक्षण घेऊनही नोकरी मिळवण्यात अपयशी ठरलेल्या शिरीषाच्या नशिबी निवडणुकीतही अपयशच आले. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शिरीषाला कोल्लापूर मतदारसंघातून 5754 मते मिळाली. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कृष्णा राव विजयी झाले आहेत. राव यांचा 29931 मतांनी विजय झाला असून, त्यांना एकूण 93609 मते मिळाली आहेत, तर बीआरएसचे उमेदवार हर्षवर्धन रेड्डी यांचा पराभव झाला आहे. रेड्डी यांना 63678 मते मिळाली आहेत. दरम्यान, बीआरएसचे उमेदवार हर्षवर्धन रेड्डी यांच्या पराभवाला शिरीषाची उमेदवारी आणि प्रचार कारणीभूत असल्याचा आरोप आता बीआरएसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या निवडणुकीत शिरीषाला मिळालेली मते चौथ्या क्रमांकाची आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Telangana Assembly Results 2023:
Hingoli News : राजीनामा देण्यास पतीकडून मारहाण; ग्रामसभेत सरपंचानी मांडली आपबीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com