Telangana Assembly Election 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता संपला. आता तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेत पंतप्रधान मोदींसह तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल, तर आधी तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चा पराभव करणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हैदराबादमध्ये प्रचार सभा घेतली. बीआरएस, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएम हे एकच आहेत आणि ते मिळून काम करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या वेळी केला.
केसीआर यांच्याविरोधात कुठले प्रकरण आहे का? केसीआर यांच्या सरकारचा सर्वांत भ्रष्ट कारभार आहे. तरीही ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारखी एकही केंद्रीय तपास यंत्रणा केसीआर यांच्या मागे का नाही?, असे सवाल उपस्थित करत राहुल गांधी यांनी भाजप आणि केसीआर यांची हातमिळवणी असल्याचा आरोप केला. ( Telangana Assembly Election 2023 )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदींविरोधात लढत असल्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमच्या विरोधात २४ खटले दाखल आहेत. न्यायालयांकडून वेळोवेळी सुनावणीसाठी नोटिसा पाठवल्या जातात. पहिल्यांदाच बदनामी प्रकरणी आपल्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. माझी खासदराकीही रद्द केली गेली. माझा सरकारी बंगलाही काढून घेण्यात आला. याला माझी काहीच हरकत नाही. कारण माझे घर देशातील गरिबांच्या हृदयात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
ओवेसींवरही साधला निशाणा
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींविरोधात किती खटले आहेत? ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा आपल्या मागे लागल्या आहेत, पण ओवेसींवर कुठल्या तपास यंत्रणेकडून कारवाई सुरू आहे का? तर नाही. ओवेसींविरोधात कुठलाही खटला का नाही? याचे कारण म्हणजे एमआयएमचे प्रमुख मोदींना मदत करतात. काँग्रेसचे नुकसान करण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एमआयएम वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपले उमेदवार मैदानात उतरवते, असे म्हणत राहुल गांधी यांनी असदुद्दीन ओवेसींवर आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.