Mallikarjun Kharge : तेलंगणातील भरसभेत मल्लिकार्जुन खर्गे संतापले अन् म्हणाले, ''ऐकायचं तर ऐका, नाहीतर...''

Telangana Election : 'रबर स्टॅम्प अध्यक्ष' संबोधत भाजपाने लगावला टोला ; या घटनेचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Congress News : भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना 'रबर स्टॅम्प अध्यक्ष' असं संबोधत त्यांच्यावर निशाणा साधला. याचे कारण, मल्लिकार्जुन खर्गे हे तेलंगणातील कलवाकुर्थी येथे एका निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना, प्रचंड भडकल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायर होत असून, यावरून खर्गे आणि काँग्रेसला ट्रोलही केले जात आहे.

नियंत्रणाबाहेर गेलेल्या रॅलीतील नागरिकांमुळे खर्गे संतापल्याची 28 सेकंदांची क्लिप शेअर करत मालवीय म्हणाले, खर्गेंना त्यांच्या सर्वच सार्वजिनिक सभांमध्ये अपमानित केले जाते आणि मग ते असहायपणे आपल्याच कार्यकर्त्यांवर ओरडतात जे त्यांचा सन्मान करत नसतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mallikarjun Kharge
Vidhnsabha Election : तेलंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 23 टक्के उमेदवार; 210 जण कोट्यधीश

गांधी परिवाराने त्यांना एक रबर स्टॅम्प अध्यक्ष बनवलं आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर, राजस्थानमधील सर्व जाहिरातींमध्ये त्यांचे फोटो एक गायबच झाले आहेत किंवा मग स्टॅम्पच्या आकाराएवढे कमी झाले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आणि गेहलोत यांचे फोटो मोठे करून झळकवले गेले आहेत. एक दलित असल्याने काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गेंचा अपमान करत आहेत का? असं मालवीय म्हणाले आहेत.

खर्गे निवडणुकीतील आश्वासनांवरून तेलंगणातील सभेला संबोधित करत होते, तेवढ्यात नागरिकांनी गोंधळ सुरू केला आणि खर्गेंच्या बोलण्यात व्यत्यय आला.

यामुळे खर्गे चांगलेच भडकले आणि थेट माईकवरच म्हणाले, ''गप्प बसा...जर ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर बाहेर जा. अशाप्रकारे ओरडू नका, तुम्हाला समजत नाही का ही जी सभा सुरू आहे त्यामध्ये एक ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा नेता बोलतोय आणि तुमच्या तोंडात येईल ते तुम्ही बोलत आहात. जर ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर आपल्या ठिकाणी जा.'' खर्गेंचा या वक्तव्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान याच सभेत काँग्रेसने तेलंगणासाठीच्या सहा निवडणूक आश्वासनांची घोषणाही केली. ज्यामध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा, दर महिन्याला महिलांना 2500 रुपये, 500 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर आणि प्रत्येक घरात 200 यूनिट वीज मोफत देण्यांच्या आश्वासनांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Mallikarjun Kharge
Dispute In BJP : ‘आमच्या घरात येऊन अमित शाहांनी माझा घात केला’; भाजपच्या माजी मंत्र्याची खदखद बाहेर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com