April 1 changes : देशभरात 1 एप्रिलपासून लागू होणार 10 मोठे बदल; जाणून घ्या, नेमके कोणते?

new rules in India : सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असेलेल्या या नियमांकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही.
April 1 changes
April 1 changesSarkarnama
Published on
Updated on

financial rule changes : आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून म्हणजेच १ एप्रिल२०२५ पासून नवीन आर्थिक वर्षांची सुरूवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येकाच्या खिशावर झाल्याचं दिसू शकतं.

या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमती, तुमचे बँक खाते, डेबिट कार्डपासून ते क्रेडिट कार्ड याबाबींचाही समावेश असणार आहे. एवढंच नाहीतर महामार्गावर प्रवास करणेही महाग होवू शकतं.कारण, अनेक मार्गांवरील टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे.

April 1 changes
Prashant Kishor on Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात आता प्रशांत किशोर यांनी घेतली उडी, म्हणाले...

1. LPG किंमतीत बदल -

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल आणि गॅस वितरक कंपन्या एलपीजी(LPG) सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे १ एप्रिलपासून बदल दिसू शकतो. तर नवीन आर्थिक वर्षांच्या सुरुवातीसोबतच १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत दिलासायक बदलाची अपेक्षा आहे.

2. CNG-PNG आणि ATFचे दर -

एलपीजी सिलिंडरच्या किंमती शिवाय सीएनजी आणि पीएनजी किंमतीमध्येही १ एप्रिलपासून बदल दिसू शकतो. कंपन्या एअर टर्बाइन फ्यूल म्हणजे एटीएफच्या दरातही बदल करू शकतात.

3. हे UPI ID होतील बंद -

ज्या मोबाईलनंबरशी जुडलेले यूपीआय(UPI) अकाउंट्स प्रदीर्घ काळापासून अॅक्टीव्ह नाहीत, ते बँक रेकॉर्ड्सवरून हटवले जातील. जर तुमचा फोन नंबर यूपीआयशी जोडलेला आहे परंतु तो प्रदीर्घ काळापासून वापरलेला नाही, तर त्याची सेवा बंद केली जाऊ शकते.

4. Debit Cardचे नवीन नियम -

रुपे डेबिट सेलेक्ट कार्डमध्ये काही मोठे अपडेट्स करणार आहे, जे १ एप्रिल पासून लागू होतील. यामध्ये फिटनेस, वेलनेस, प्रवास आणि मनोरंजन यांचा समावेश आहे.

April 1 changes
Raj Thackeray on Aurangzeb tomb: ''ती औरंगजेबाची कबर...''; राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्टच सांगितलं!

5. UPSची सुरुवात -

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच १ एप्रिलपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देणारी यूनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजेच UPSची सुरुवात होणार आहे. पोर्टलवर १ एप्रिलपासून केंद्रीय सरकारी कर्मचारी अप्लाय करू शकतील.

6. Tax स्लॅबशी निगडीत नियम -

केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना दिलासा देत सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील बदलापासून टीडीएस, टॅक्स रिबेट आणि अन्य बाबींचा समावेश होता. जुना प्राप्तिकर कायदा 1961च्या जागी नवीन इन्कम टॅक्स बिलाचा प्रस्ताव मांडला होता. हे सर्व बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.

7. TDSच्या मर्यादेत वाढ -

याशिवाय TDSच्या नियमात देखील अपडेट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अनावश्यक कपातीस कमी करणे आणि करदात्यांसाठी कॅश फ्लोमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध वर्गांमध्ये लिमिट वाढवली गेली आहे.

8. क्रेडिट कार्डशी निगडीत नियम -

1 एप्रिल 2025 पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होत आहेत. जे त्यांच्यावर मिळणाऱ्या रिवॉर्डपासून अन्य सुविधांवर परिणाम करतील. SBI आपल्या SimplyCLICK क्रेडिट कार्डवर Swiggy रिवॉर्डला पाच पटीहून कमी करून अर्धा करेल. तर Air India सिग्नेचर पॉइंट्सला 30ने कमी करून 10 केले जाईल.

9. बँक खात्यांशी निगडीत नियम-

एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह अन्य अनेक बँक ग्राहकांच्या बचत खात्यांमध्ये किमान बॅलन्सशी निगडीत नियमात बदल करणार आहेत.

10. Toll Tax टॅक्समध्ये वाढ -

नॅशनल हायवे ऑथरेटी आज म्हणजेच 31 मार्च मार्च्या मध्यरात्रीपासून टोल टॅक्सच्या दरात वाढ करू शकते. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या हायवे प्रवासावर होईल.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com