UPI Transactions : अवघ्या एक महिन्यात देशभरात 'UPI'द्वारे झाले तब्बल 12.2 अब्ज व्यवहार!

MLA Ravindra Chavan : भाजपला प्रचारासाठी सापडला आणखी एक मुद्दा; रवींद्र चव्हाण यांनी केलं मोदींचं अभिनंदन
UPI Transactions
UPI TransactionsSarakarnama

भाग्यश्री प्रधान -

Dombivali News : देशातील आज घडीला कोट्यवधी नागरिक व्यवहारासाठी UPIचा वापर करत आहेत. मागील महिन्यात तर देशभरात UPIद्वारे 12.2 अब्ज व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला प्रचारासाठी आणखी एक मुद्दा मिळाल्याचे दिसत आहे.

यावरूनच डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक सोशलमीडियावर अभिनंदनाची पोस्ट करत कौतुक केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

UPI Transactions
Uddhav Thackeray : '...तेव्हा आम्हाला 'मातोश्री'हून आव्हाडांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे!'

या पोस्टमध्ये आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांच्या नेतृत्वात आपला देश डिजिटल क्षेत्रात नवनवीन उच्चांक गाठत आहे. मोदींच्या दूरदर्शी विचारामुळे देशात डिजिटल क्रांती घडली. देशातील कोट्यवधी नागरिक व्यवहारासाठी यूपीआयचा वापर करत आहेत.'

तसेच, मागील महिन्यात देशभरात यूपीआयद्वारे 12.2 अब्ज व्यवहार झाले असून 2022 च्या तुलनेत 2023मध्ये डिजिटल व्यवहारात वार्षिक 59 टक्के वाढ झाली आहे. पेपरलेसच्या इकॉनॉमीच्या दिशेने नवा भारत यशस्वी वाटचाल करत आहे.' असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे. शिवाय डिसेंबर महिन्यात झालेल्या 12.2 अब्ज व्यवहारांचे मूल्य 18.23 लाख कोटी रुपये आहे. असा उल्लेखही रवींद्र चव्हाणांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला आहे.

प्रचारासाठी आणखी एक मार्ग गवसला...

भाजपकडून प्रचार करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधून काढल्या जातात. 2014 ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी डिजिटल मीडियाचा अधिक वापर केला होता.

त्यानंतर हळू हळू सगळ्याच शासकीय कार्यालयात त्यांनी डिजिटल गोष्टींना प्राधान्य द्या, अशा सूचना सर्वच राज्यांमध्ये केल्या. 2023ला जास्तीत जास्त नागरिकांनी UPIकोड वापरत आपले व्यवहार देखील डिजिटल केल्याने भाजपला प्रचारासाठी आणखी एक मार्ग गवसला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

UPI Transactions
BJP Vs Jitendra Awhad : ठाण्यात आव्हाडांच्या घराबाहेर भाजप महिला मोर्चाचे आंदोलन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com