Tesla India : भारतात येण्याआधीच ट्रम्प यांच्या सर्वाधिक विश्वासू सहकाऱ्याला झटका

Tesla India Head Prashanth Menon Resigns : टेस्लाची पुढील काही दिवसांत भारतात एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू असताना कंपनीचे भारतातील प्रमुख प्रशांत मेनन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
PM Modi And Elon Musk
PM Modi And Elon MuskSarkarnama
Published on
Updated on

Tesla’s Future in India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सरकारी म्हणून उद्योगपती इलॉन मस्क यांची ओळख आहे. ट्रम्प यांचा प्रचार असो की त्यासाठी लागणारा अमाप पैसा मस्क यांनी निवडणुकीत ओतला होता. त्यानंतर त्यांना सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ट्रम्प यांच्याकडून भारतात टेस्ला ही त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला मोठा धक्का बसल्याचे वृत्त आहे.

टेस्लाची पुढील काही दिवसांत भारतात एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू असताना कंपनीचे भारतातील प्रमुख प्रशांत मेनन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मस्क यांच्या भारतात पाय रोवण्याच्या योजनेला येण्याआधीच मोठा झटका बसला आहे. सध्या मुंबईसह दिल्लीत टेस्लाच्या डीलरशिपबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे.

PM Modi And Elon Musk
Manohar Parikar : मनोहर पर्रीकरांची आज आठवण येतेय! राफेल, सुदर्शन चक्रने उतरवलीय पाकड्यांची मिजास...

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये प्रशांत मेनन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पद सोडल्याचे म्हटले आहे. याबाबत अद्याप टेस्लाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मेनन यांच्या राजीनाम्यामागे नेमके कारण कोणते आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यामागे कारणही तसेच आहे. प्रशांत मेनन हे तब्बल नऊ वर्षे टेस्लासोबत काम करत होते.

मेनन हे जवळपास चार वर्षे टेस्ला इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी पुण्यात 2021 मध्ये कंपनीच्या भारतातील कार्यालयाची सुरूवात केली होती. त्याआधी ते अमेरिकेत टेस्लासाठी काम करत होते. त्यामुळे मेनन यांचा राजीनामा मस्क यांच्या भारतातील योजनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

PM Modi And Elon Musk
Mumbai Alert : मुंबईत ड्रोनच्या घिरट्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन...

दरम्यान, प्रशांत मेनन यांची जागा आता कोण घेणार, याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जोपर्यंत टेस्लाला भारतात प्रमुख मिळणार नाही, त्यांच्या एन्ट्रीला ब्रेक लागू शकतो, अशी चर्चा आहे. सध्यातरी भारतातील काम चीनमधून सुरू राहणार असल्याचे समजते. टेस्लाकडून मुंबई आणि दिल्लीत कंपनीचे शोरुम सुरू करण्याचा प्लॅन आहे. तो कधी प्रत्यक्षात येणार, याची उत्सुकता भारतीयांना लागली आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com