TET Supreme Court : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; TET बाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आला, एक वर्षांची मुदतवाढ...

Teacher eligibility test India : न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर काही दिवसांपूर्वीच सुनावणी पूर्ण झाली होती. त्यावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला होता.
TET Supreme Court : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; TET बाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आला, एक वर्षांची मुदतवाढ...
Published on
Updated on

Teacher recruitment news : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिक्षकांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी काहीसा दिलासा दिला आहे. त्याचवेळी कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET सर्व शिक्षकांना बंधनकारक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. याबाबतच्या सर्व पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देशातील शाळांमधील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याचा आदेश दिला होता. यातून पाच वर्षांपेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना वगळण्यात आले होते. मात्र, त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण व्हावे लागेल, असे कोर्टाने म्हटले होते. या निकालानंतर अनेक पुनर्विचार याचिका दाखल झाल्या होत्या.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर काही दिवसांपूर्वीच सुनावणी पूर्ण झाली होती. त्यावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला होता. अखेर आज कोर्टाचा निकाल आला आहे. कोर्टाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीची मुदत एक वर्षांनी वाढविली आहे. त्यानुसार आता शिक्षकांना ३१ ऑगस्ट २०२७ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करावी लागेल.

TET Supreme Court : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; TET बाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आला, एक वर्षांची मुदतवाढ...
MLC Election news : विधानपरिषदेचे आघाडीचे जागावाटप जाहीर; पुणे, ठाणे पवारांकडे, ठाकरेंच्या वाट्याला 4 जागा, वाटाघाटीत काँग्रेसच मोठा भाऊ...

कोर्टाच्या या आदेशानुसार शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. यापुढे मुदतवाढ वाढवून दिली जाणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम असणार आहे.

TET Supreme Court : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; TET बाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आला, एक वर्षांची मुदतवाढ...
IMD weather alert : हवामान खात्याचा धडकी भरविणारा अंदाज; जून महिन्यात अनेक भागात उष्णतेची लाट, महाराष्ट्रातील पावसाची स्थिती समोर...

कोर्टाने २००९ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे केवळ पाच वर्षांपेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांनाच यातून दिलासा मिळणार आहे. उर्वरित सर्व कार्यरत शिक्षक तसेच नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक असणार आहे. कार्यरत शिक्षकांना दिलेल्या मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही तर त्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com