Supreme Court News : ठाकरे गटाचे शिवसेनेला आव्हान ; प्रभाग रचनेचा वाद सुप्रीम कोर्टात..

BMC Ward structure dispute : शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी या याचिका केल्या होत्या.
 Supreme Court News
Supreme Court News Sarkarnama
Published on
Updated on

BMC Ward structure dispute : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (११ मे) जाहीर होत आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्णय देईल. कोर्टाच्या या निकालावरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्यही अवलंबून असेल.

अशातच प्रभाग रचनेचा वादाच्या सुनावणीवर १८ मे रोजी सुनावणी होणार आहे.ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिलेल्या निर्णयाला काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

गेल्या महिन्यात मुंबईतील महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ असेल असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या निर्णयाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

 Supreme Court News
Subramanian Swamy on Mamata Banerjee: मोदी नव्हे, ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हायला पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान..

शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी या याचिका केल्या होत्या. शिंदे सरकारचा प्रभागसंख्या पूर्ववत करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने असून तो वैधच आहे, असे नमूद करून शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळल्या होत्या.

 Supreme Court News
Ajit Pawar's Prediction: सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पेडणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, मुदत संपत आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी दिले होते. शिवाय ११ मार्च २०२२ पूर्वीची प्रभागसंख्या त्यासाठी ग्राह्य धरण्याचेही स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com