भोपाळ : परिवारवादी पक्ष म्हणून होणारी टीका टाळण्यासाठी भाजपने (bjp) आता कंबर कसली आहे. पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत तिकिटांची स्वप्ने पाहणाऱ्या नेत्यांच्या मुलांना भाजपनं मोठा धक्का दिला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (j P Nadda) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायची नाहीत. त्यांना आधी संघटनेत काम करावे लागेल, असे नड्डा यांनी स्पष्ट केल्यानं मुलांसाठी तिकीटाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दणका भाजपनं दिला असल्याची चर्चा आहे. नड्डा भोपाळ येथे बोलत होते. (j P Nadda news update)
परिवारवादी पक्ष म्हणजे नेमके काय? नेत्यांच्या मुलांना निवडणुकीची तिकिटे देण्याबाबत भाजपचे धोरण काय आहे? याबाबत नड्डा यांनी भाजपचे धोरण स्पष्ट केलं. केंद्रीय संघटनेने केलेल्या धोरणानुसार तिकिटांचे वाटप केले जाईल, असेही ते म्हणाले.'एक व्यक्ती एक पद' हे धोरण आता काँग्रेसबरोबर भाजपनेही राबविण्याचे ठरवले आहे. घराणेशाही रोखण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे,
नड्डा म्हणाले, "भाजपने धोरण ठरवले आहे की एका व्यक्तीला एक काम द्यायचे आहे. हे केवळ विधानसभा निवडणुकीतच नाही, तर महापालिका निवडणुकीतही लागू होईल. यूपीचे उदाहरण देताना नड्डा म्हणाले की, तेथील अनेक खासदारांचे पुत्र चांगले काम करण्याचे दावेदार होते, पण त्यांना तिकीट दिले नाही. नेत्यांच्या मुलांनी सध्या संघटनेच्या कामात गुंतले पाहिजे,"
नड्डा म्हणाले की, आपल्याला घराणेशाहीची संकल्पना समजून घ्यावी लागेल. वडील अध्यक्ष, मुलगा किंवा मुलगी सरचिटणीस. संसदीय मंडळात काक, काकू, बहीण, जावई हा परिवारवाद आहे.
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स (जम्मू आणि काश्मीर), लोक दल (हरियाणा), शिरोमणी अकाली दल (पंजाब), समाजवादी पार्टी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय जनता दल (बिहार), टीएमसी (पश्चिम बंगाल), डीएमके (तामिळनाडू), कर्नाटक कुमार स्वामींच्या पक्षात, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. हे सगळे पक्ष परिवारवादी आहेत. तेथे वडिलांच्या पश्चात मुलगा किंवा मुलगी, जावई जागा घेतात. भाजप आपल्या धोरणात असे करणार नाही, असे नड्डा म्हणाले.
"जम्मू-काश्मीरवर कोणीही गप्प बसलेले नाही. केंद्र सरकार कृती करत आहे. आता फक्त गोळ्या शांत होत नाहीत तर ती झाडणाऱ्याला शांत केले जाते. स्थानिक निवडणुका शांततेत पार पडल्याने नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे," असे नड्डा म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.