PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ‘कोरोना’तील कामाचा मोठा सन्मान

Covid 19 Vaccine Dominica Highest National Honour : कोरोना काळात भारताने डोमिनिका देशाला लस आणि औषधांचा पुरवठा केला होता.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : कोरोनाच्या महामारीचा संपूर्ण जगाला विळखा पडला होता. या काळात भारताने अनेक देशांना लस आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात दिला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे अनेक देशांनी कौतुक केले. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डोमिनिका या देशाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. यापूर्वीही अनेक देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे. या यादीत डोमिनिकाचाही समावेश झाला आहे. मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव म्हणून या देशाने हा मोदींना सन्मानित केले आहे. यामुळे भारताची मान उंचावली आहे.

PM Narendra Modi
ED Raid in Maharashtra: पैसे घ्या, मतं द्या! निवडणुकीच्या रणधुमाळीत ED ची मुंबईसह नाशिक, मालेगावमध्ये छापेमारी

कोरोना काळात अनेक देशांना लस आणि औषधांचा तुटवडा जाणवत होता. अशावेळी भारताने मदतीचा हात पुढे करत या देशांना लशीचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पंतप्रधान मोदींनी या कठीण काळात घेतलेल्या निर्णयांचे डोमिनिका सरकारने कौतुक केले आहे. 

उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटांवर डोमिनिका हो देश आहे. या देशाकडून ‘अवॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. कोरोना काळात भारताने डोमिनिकाला मोठी मदत केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबुत झाल्याचे डोमिनिकाने म्हटले आहे. मोदींना सन्मान देऊन या देशाने हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

PM Narendra Modi
Pankaja Munde : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ नाऱ्याला पंकजा मुंडेंचा विरोध; म्हणाल्या...

दरम्यान, डोमिनिका सरकारने याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रका म्हटले आहे की, फेब्रुवारी 2021 मध्ये डोमिनिकाला भारताने कोरोना लशीचे 70 हजार डोस पाठवले होते. तसेच भारताने आरोग्य, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डोमिनिकाला मदत केली. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा सन्मान दिला जात आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com