Narendra Modi : रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव अन् द्रविडला PM मोदींचा फोन; काय म्हणाले?

Narendra Modi's call to the Indian Cricket Team : भारतीय संघाने शनिवारी इतिहास घडवत टी-20 वर्ल्ड कप पुन्हा एकदा आपल्या नावावर केला. भारताने संघाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला.
 Narendra Modi Indian Cricket Team
Narendra Modi Indian Cricket TeamSarkarnama

Narendra Modi : भारतीय संघाने शनिवारी इतिहास घडवत टी-20 वर्ल्ड कप पुन्हा एकदा आपल्या नावावर केला. भारताने संघाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजायानंतर देशभरात जोरदार जल्लोष केला जात आहे. अनेक ठिकाणी आतषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केलं जात आहे.

अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाचे अभिनंदन करण्यासाठी मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. तर रविवारी खेळाडूंना थेट फोन करत त्यांनी कौतुक केलं आहे.

फोनवरुन पंतप्रधानांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) उत्कृष्ट कर्णधारपदासाठी अभिनंदन केलं शिवाय त्याच्या टी-20 मधील कारकिर्दीचीही प्रशंसा केली. शिवाय अंतिम सामन्यातील विराट कोहलीच्या योगदानाचे कौतुक केले. तसंच यावेळी हार्दिक पांड्याचे शेवटचे षटक, सूर्य कुमार यादवचा कॅचचे आणि जसप्रीत बुमराहचे देखील कौतुक केलं. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही मोदींनी आभार मानले.

 Narendra Modi Indian Cricket Team
Manoj Pande: रिटायरमेंटच्या दिवशी मनोज पांडे यांना 'गार्ड ऑफ ऑनर'; उपेंद्र द्विवेदी नवे लष्कर प्रमुख

दरम्यान, एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) लिहिलं, 'आमचा संघ टी-20 वर्ल्ड कप आपल्या स्टाइलमध्ये घरी आणतो! भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक ठरला.' तसंच यावेळी त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, भारतीय संघाला देशभरातील जनतेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

 Narendra Modi Indian Cricket Team
Sharad Pawar : "लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं", राज ठाकरेंचं विधान अन् शरद पवारांनी मोजक्याच शब्दांत दिलं उत्तर...

आज 140 कोटी लोकांना तुमच्या या शानदार कामगिरीमुळे वाटत आहे. तुम्ही विश्वचषक जिंकला. पण आज तुम्ही देशातील प्रत्येक गल्लीतील लोकांचे मन जिंकले आहे. तसंच हा टी-20 विश्वचषक वेगळ्या कारणामुळे आठवणीत राहील. एवढे देश आणि टीम होत्या पण तरीही भारताचा एकाही सामन्यात पराभव झाला नाही. क्रिकेट जगतातील दिग्गज टीमचा तुम्ही सामना केला. तुम्ही शानदार विजय मिळवला, अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com