Supreme Court News : शिंदेंसाठी 'वरदान' ठरलेल्या केसचा सुप्रीम कोर्टात होणार पुनर्विचार

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार सर्वोच्च न्यायालयाकडून केला जाणार आहे.
Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis
Supreme Court Hearing on Maharashtra Political CrisisSarkarnama
Published on
Updated on

Nabam Rebia case : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार सर्वोच्च न्यायालयाकडून केला जाणार आहे. गुरुवारी या खटल्यासंदर्भात 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी कधी होणार आहे, त्यांची रूपरेषा उद्या स्पष्ट होणार आहे. ठाकरे गटाने तेव्हा हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावे ही विनंती केली होती.

केवळ एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला नव्याने होणार आहे. शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडले त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. शिंदे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) यांच्यावर अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यामुळे त्यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेता आला नाही.

Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis
IPS Fake FB Account : चंद्रपूरच्या एसपींचे फेसबुक हॅक; 'सरकारनामा'ने केले 'IPS' परदेशींना जागे

या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करावा अशी मागणी ठाकरे गटाने न्यायालयात केली होती. मात्र, त्यावेळी ती मागणी फेटाळताना न्यायालयाने केसच्या मिरिटवर आपण त्याचा विचार करु, असे म्हटले होते. तर सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा अंतिम निकाल देताना पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने नबाम रेबिया केसचे प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे पाठवले होते. त्यावर आता खंडपीठ गठीत करण्यात आले असून त्यांच्या सुनावणीचे वेळापत्रक उद्या ठरण्याची शक्याता आहे.

नबाम रेबिया प्रकरण काय आहे?

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh) नबाम रेबिया या प्रकरणाची सुनावणी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात झाली होती. विधानसभाध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस दिली असेल तर दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार त्यांना उरत नाही, असा निकाल या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

त्यामुळे शिंदे गटाने या निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात आपला युक्तिवाद केला होता. उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याविरोधातला अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झालेला असल्यामुळे ते आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाहीत, असे शिंदे गटाचे म्हणणे होते. आता या निर्णयाचा सात न्यायमुर्तींच्या खंडपीठासमोर पुनर्विचार होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis
Sharad Pawar News : शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना 'होमग्राऊंड'वरच मोठा धक्का; 'या' माजी खासदारालाच फोडलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com