IPS Fake FB Account : चंद्रपूरच्या एसपींचे फेसबुक हॅक; 'सरकारनामा'ने केले 'IPS' परदेशींना जागे

Chandrapur SP News : फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
IPS Ravindra Singh Pardeshi News
IPS Ravindra Singh Pardeshi NewsSarkarnama
Published on
Updated on

IPS Ravindra Singh Pardeshi News : फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे असे बनावट अकाउंट तयार करून लोकांची फसवणूक करणे सोपे जाते, त्यामुळे असे प्रकार केले जातात. लोक त्याला बळीही पडतात.

आता चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्याची ही या आठवड्यातील समोर आलेली दुसरी घटना आहे.

रवींद्रसिंह परदेशी हे सध्या चंद्रपूर (Chandrapur) येथे पोलिस अधीक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी धाराशिव (उस्मानाबाद) येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. धाराशिव जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाद्वारे छाप पाडली होती.

ते चोखंदळ वाचक आहेत. त्यानंतर त्यांनी पुणे, बारामती येथेही काम केले. काही वर्षांपूर्वी त्यांची आयपीएस म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर पुण्यातून त्यांची चंद्रपूरचे पोलिस(Police) अधीक्षक म्हणून बदली झाली. त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली.

IPS Ravindra Singh Pardeshi News
PCMC News : आमदार अश्विनी जगतापांच्या अपमानाचा वाद पेटला ; शहर सरचिटणीस ढाकेंच्या राजीनाम्याची मागणी

बुधवारी सकाळी हा प्रकार सुरू झाला. हॅक केलेल्या अकाऊंटमध्ये त्यांची जन्मतारीख १९ जुलै १९९४ अशी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे 'सरकारनामा'ने त्यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार लक्षात आणून दिला.

हे अकाउंट बनावट असून, कुणीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. ती स्वीकारली की हॅकर मग पैशांची मागणी करतात.

एवढा मोठा अधिकारी आपल्याला पैसे मागतोय, अशा भ्रमात राहून काहीजण त्याला बळी पडून आर्थिक फसवणूक करून घेतात. या आठवड्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप भाजीभाकरे यांचेही फेसबुक (Facebook) अकाउंट हॅक करण्यात आले होते. हॅकरने अनेकांशी मेसेंजरवर संपर्क साधून पैशांची मागणी केली होती.

भाजीभाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून अशा प्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन केले होते. भाजीभाकरे यांचे अकाउंट हॅक करून हॅकरने अनेक लोकांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आता आयपीएस अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली की हॅकर पैशांची मागणी करतात. अकाउंट हॅक झाल्यानंतर 'सरकारनामा'ने रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधला, ते क्षणभर अवाक् झाले. त्यांनी फेसबुकवर जाऊन खात्री केली आणि अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले. कुणीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

IPS Ravindra Singh Pardeshi News
PCMC News : ऑनलाईन जुगारात करोडपती झालेल्या पीएसआय झेंडेंच्या अडचणी वाढल्या ; भाजपची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com