Sharad Pawar News : शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना 'होमग्राऊंड'वरच मोठा धक्का; 'या' माजी खासदारालाच फोडलं

NCP Praful Patel Political News : प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गोंदियात अजित पवार गटाला खिंडार पडले आहे.
Sharad Pawar - Praful Patel
Sharad Pawar - Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on

Gondia News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून १०० दिवस उलटून गेले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी पक्ष,चिन्हावरुन कायदेशीर लढाई सुरू असतानाच दोन्ही गटाकडून संख्याबळाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तसेच दोन्ही गटाकडून नेत्यांना पक्षात प्रवेश एकमेकांना शह - प्रतिशह देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. आता शरद पवारांनी थेट खासदार प्रफुल्ल पटेलांना त्यांच्याच 'होमपीच'वर जोरदार झटका दिला आहे.

माजी खासदार खुशालचंद्र बोपचे (Khushal Bopche)आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला.अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डॉ. राजेश टोपे हे उपस्थित होते.

Sharad Pawar - Praful Patel
Arthur Road Jail : आर्थर रोड कारागृहातील कैद्याला ड्रग्ज पुरवणं भोवलं; पोलीस हवालदार निलंबित

प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.दोनच दिवसापूर्वी सालेकसा तालुक्यातील राष्ट्रवादी युवकच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.अजित पवारांच्या बंडावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

पण भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसची साथ दिली.या धक्क्यानंतर ४८ तासांतच आता माजी खासदार बोपचे यांच्यासह त्यांच्या मुलाने शरद पवार(Sharad Pawar) गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे(KhushalChandra Bopche) यांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.तसेच डाॅ.बोपचे यांचे चिरंजीव व भाजपचे जिल्हा महामंत्री राहिलेल्या रविकांत बोपचे यांनी तिरोडा विधानसभेसाठी 2019 ला भाजपकडे उमेदवारी मागितली होती.

मात्र,पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी देखील पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतले होते.यानंतर खोपचे पिता-पुत्र राष्ट्रवादीत होते. जुलै महिन्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली होती.पण आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar - Praful Patel
PCMC News : ऑनलाईन जुगारात करोडपती झालेल्या पीएसआय झेंडेंच्या अडचणी वाढल्या ; भाजपची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com