भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर हे नावे राज्यसभेसाठी चर्चेत!

Rajya Sabha Latest News : राज्यसभा निवडणुकीची घोषणा
vinod tawde, Vijaya Rahatkar
vinod tawde, Vijaya Rahatkarsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha) ६ जागांसाठी येत्या १० जूनला मतदान व त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासह १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक घेण्याची घोषणा केली. यूपीतील सर्वाधिक ११ तर महाराष्ट्र व तमिळनाडूतील प्रत्येकी ६ खासदार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. (Rajya Sabha Latest News)

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेचे सभागृहनेते पियूष गोयल यांच्यासह शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल (Praful Patel), डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (भाजप), विकास महात्मे (भाजप) आणि काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप (BJP) राज्यसभेसाठीच्या ६ खासदारांची निवड बिनविरोध करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

vinod tawde, Vijaya Rahatkar
फडणवीसांनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो

गोयल, सहस्त्रबुध्दे, राऊत, पटेल यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेतील प्रभावी कामगिरी व अनुभव या आधारांवर अनुक्रमे डॉ. सहस्त्रबुध्दे व चिदंबरम यांनाही पुन्हा संधी मिळेल असे सांगितले जात आहे. मात्र, गोयल यांना तिकीट देण्याच्या अपरिहार्यतेनंतर भाजपने उर्वरीत जागेसाठी 'कोटा' पध्दत लावली तर एखादे नवे नावही पुढे येऊ शकते. उदयपूरच्या चिंतनानंतर कॉंग्रेस नेतृत्व माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याबाबत काय निर्णय घेते यावर चिदंबरम यांना पुन्हा संधी मिळणे अवलंबून असेल, असे जाणकार मानतात.

भाजपच्या बाजूने विनोद तावडे (Vinod Tawde) व विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपने राष्ट्रपतीनियुक्त कोट्यातून संधी दिलेले छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी 'एकला चलो रे' ची भूमिका घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. यावेळी १०६ आमदार असलेल्या भाजपकडे अतिरिक्त मते असल्याने त्यांचे तीन खासदारही निवडून येऊ शकतात.

या निवडणुकीसाठी २४ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. ३१ मे अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असेल. १ जून रोजी छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख ३ जून असेल. सर्व ५७ जागांवर १० जून रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी होईल.

vinod tawde, Vijaya Rahatkar
नानांचे अजितदादांना तिखट उत्तर : जयंत पाटलांनी सही केलेले पत्रच दाखवले!

कोणत्या राज्यात किती जागा?

उत्तर प्रदेश-११

महाराष्ट्र- ६

तामिळनाडू-६

बिहार-५

कर्नाटक- ४

राजस्थान-४

आंध्र प्रदेश- ४

मध्य प्रदेश- ३

ओडिशा -३

पंजाब-२

झारखंड- २

हरियाणा-२

तेलंगण- २

छत्तीसगड-२

उत्तराखंड-१

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com