नानांचे अजितदादांना तिखट उत्तर : जयंत पाटलांनी सही केलेले पत्रच दाखवले!

Nana Patole | Congress : नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपमध्ये गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले.
Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News
Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांची फिरकी घेतली. तसेच त्यांनी मारलेल्या बेडूक उड्यांचीही आठवण करून दिली. पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत पवारांनी ते कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत, याची आठवण करून दिली.

अजित पवार यांच्या या टीकेवर आता नाना पटोले यांनी पुन्हा उत्तर दिले असून "लिखीत करार मोडणे म्हणजे पाठीत खंजीर खूपसणेच!" असे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही अशीही प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News
हास्यास्पद! खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नानांना अजितदादांनी 'ती' आठवण करून दिली

काय म्हणाले नाना पटोले?

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. 30 जानेवारी 2022 रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली.

Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले चिडले

राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपसोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती, पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे.

Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News
पटेल-पटोले वादाचा भाजपला फायदा; काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर

प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांची पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे. त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे. दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com