Supreme Court Result On Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 8 ते 12 मे दरम्यान लागणार?

Supreme Court Result On Maharashtra Politics : पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा...
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा लागलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये 8 ते 12 मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवरच 8 ते 12 मे या कालावधीतील तारखांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कायदेतज्ज्ञांच्या वर्तुळामध्येही अशीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवलेला आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Deepak Kesarkar News: आम्ही ठाकरेंबाबत जे बोलत होतो ते पवारांनी पुस्तकातून स्पष्टपणे सांगितलंय; केसरकरांचा दावा !

शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. तर दुसरीकडे जवळपास 26 जून 2022 पासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातच्या प्रकरणावर सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु होती.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात तरी हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Sharad Pawar News : 'फडणवीसांची ‘ती’ खेळी शिवसेनेला थोडी उशिराच उमगली; पण त्यांचं खरं टार्गेट राष्ट्रवादीच होती...'

दरम्यान, पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा असणार आहे, अशी चर्चा आहे. तसेच सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग येत आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com