Rahul Gandhi News : ज्या कोलरमधील वक्तव्याने राहुल गांधींची खासदारकी गेली; तिथूनच फोडणार कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ

Congress Vs BJP : ५ एप्रिल रोजी 'सत्यमेव जयते' प्रचार सभेचे आयोजन
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Karnataka Assembly Election : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार कर्नाटकमध्ये १० मे रोजी निवडणुका होणार आहेत. तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षासह भारतीय जनता पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर होताच दोन्ही बाजूकडून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणावरील वक्तव्यामुळे खासदारकी रद्द झाली, त्या कोलारमधूनच राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसच्या प्राचाराचा शुभारंभ करणार आहेत. कोलार (Kolar) येथे ५ एप्रिल रोजी राहुल गांधीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधीच्या या प्रचार सभेला 'सत्यमेव जयते' असे नाव देण्यात आले आहे. सूरत न्यायालयाचा निकाल, त्यांची रद्द झालेली खासदारकी , आदानींवरून केंद्र सरकारवर उपस्थित केलेले प्रश्न यावर ते काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi
Amritpal Singh News : अमृतपाल सिंगकडून पोलिसांच्या हातावर पुन्हा तुरी; काही केल्या सापडेना !

दरम्यान, २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोलार येथे काँग्रेस (Congress) पक्षाने रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी अडनावावरुन वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, "नीरव मोदी, ललित मोदी हे देशातील पैसे घेऊन परदेशात पळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपतींना मदत करीत आहेत. मला हेच कळत नाही की सर्व चोरांचे आडनाव हे मोदी का असते?"

त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण ओबीसी समाजाची बदनामी झाली, असा आरोप करण्यात आला. त्यानुसार गुजरातमधील भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी खटला दाखल केला होता. या प्रकरणावर सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Rahul Gandhi
Arvind Kejriwal Big announcement : अरविंद केजरीवालांनी वाढवलं भाजप-काँग्रेसचं टेन्शन? केली मोठी घोषणा

दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा सचिवालयाने संसदेत आलेल्या राहुल गांधींना त्याचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगितले. तसा आदेश त्यांनी जारी केला. पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी राहुल गांधींसह काँग्रेसला मोठे धक्के सहन करावे लागले.

राहुल गांधींनी मात्र संसदेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम आदानी यांच्या मैत्रीबाबत आपण प्रश्न उपस्थित करीत होतो. तसेच आदानींच्या कंपनीत १० हजार कोटी रुपये कुठून आले, असा प्रश्नही करीत होतो. यापुढे मी काय बोलणार आहे, याची भाजपला (BJP) कल्पना आली होती. त्यातूनच सूडभावनेने भाजपने कारवाई केल्याचे म्हटले आहे.

Rahul Gandhi
Mahesh Landge On Girish Bapat's Demise : कुस्तीचे प्रशिक्षण घेत होतो तेव्हापासून...; आमदार लांडगेंनी सांगितल्या बापटांच्या आठवणी

या सर्व पार्श्वभूमीर कर्नाटकमधील कोलारभूमीवर राहुल गांधी पुन्हा जाणार आहेत. तेथे 'सत्यमेव जयते' सभेत काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या या सभेत राहुल गांधी भाजप, पंतप्रधान मोदी आणि आदानींचे संबंध आणि रद्द झालेली खासदारकी यावर काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com