Arvind Kejriwal Big announcement : अरविंद केजरीवालांनी वाढवलं भाजप-काँग्रेसचं टेन्शन? केली मोठी घोषणा

Aam Aadmi Party : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार असून मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. असे असतानाच 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.

Arvind Kejriwal
Harshvardhan Jadhav News : सगळे राजकीय पक्ष स्वार्थी, म्हणून महाराष्ट्र भिकारी झालायं..

दिल्ली, पंजाबनंतर आम आदमी पार्टी आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. केजरीवालांनी ही घोषणा केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.

आम आदमी पार्टी आता कुणाला टक्कर देणार? हे निवडणुकीच्या वेळीच पाहायला मिळणार आहे. केजरीवालांनी याआधीच कर्नाटकमध्ये रॅली देखील काढली होती. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत आता चार मोठे पक्ष लढणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

Arvind Kejriwal
Shivadi Court Fines Sanjay Raut: खासदार संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचा दणका

भाजप, काँग्रेस, जेडीएस, आम आदमी पार्टी हे मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असून या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com